Bigg Boss Marathi 2: 'शिवानी सुर्वे' फिनाले मध्ये पोहचल्याने बिग बॉसचे चाहते संतापले; सोशल मिडीयावर उमटल्या अशा प्रतिक्रिया
शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉस मराठीचे 2 रे पर्व (Bigg Boss Marathi 2) कधी सुरु झाले आणि कधी संपत आले हे समजलेही नाही. पहिल्या सीझनपेक्षा हा सीझन अतिशय ‘थंडा’ असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हा शो कसाबसा तग धरून राहावा म्हणून मेकर्सनी अनेक फंडे वापरले. त्यात शिवानी, बिचुकले आणि पराग यांनी काही काळापुरती शोला प्रसिद्धी मिळवून दिली. शिवानी सुर्वे स्वतःहून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर जेव्हा ती परत आली तेव्हा शोच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली होती. काल बिग बॉसच्या घरातील शेवटचा नॉमिनेशन टास्क पार पडला आणि यामध्ये नेहा व शिवानी थेट फिनालेमध्ये दाखल झाल्या आहेत.

हे पाहून बिग बॉस मराठीचे चाहते भडकले आहेत. शिवानी नेहमीच इतरांच्या आधारावर खेळत आली आहे. चाहत्यांच्या मनात जागा ननिर्माण करण्यात ती पूर्णपणे अयशस्वी ठरली. त्यात तिचे आरडणे, ओरडणे, चिडणे, फटकळ बोलणे अशा अनेक गोष्टींमुळे ती चाहत्यांच्या नजरेतून उतरत गेली. मात्र आता घरातील बाहेर पडलेल्या सदस्यांनी नेहा आणि शिवानी यांना फिनालेचे तिकीट दिले आहे. याबद्दल सोशल मिडीयावर राग उमटत आहे. यासाठी शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनाही जबाबदार ठरवले जात आहे. महेश यांनी नेहमीच शिवानीची बाजू घेतली व प्रत्येकवेळी वीणा आणि शिववर वार केले. हीच गोष्ट चाहत्यांना खटकली आहे, अनेकांनी बिग बॉसच्या मराठीच्या 3 ऱ्या सीझन साठी नवा होस्ट घ्यावा अशी मागणी केली आहे. (हेही वाचा: नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांना मिळाले बिग बॉसच्या Final चे तिकिट, तर आरोहला टॉपमध्ये दिसण्याची संधी न दिल्याने व्यक्त केली खंत)

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया -

मुळात नॉमिनेशन टास्क दिला तर शिवानी त्यात हरण्याची शक्यता होती, म्हणून मुद्दाम बाहेरच्या लोकांकडून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली असा आरोप बिग बॉसवर होत आहे. शिवानी सारख्या अपात्र सदस्याला फिनालेमध्ये मुद्दाम पोहचवल्याने, बिग बॉसमध्ये काय होईल हे आधीच ठरलेले असते असाही आरोप या शोवर केला जात आहे.