
बिग बॉसच्या घरात टॉप 6 सदस्यांना भेटण्यासाठी या सीझनमधील घरातून आउट झालेले सदस्य भेटण्यासाठी येणार होते. तर आज रुपाली हिची घरात एन्ट्री होते. त्याचसोबत रुपाली अंतिम फेरीत टॉप टू साठी शिवानी आणि नेहा हिला निवडते. मात्र रुपाली हिच्या निर्णयावरुन वीणा आणि किशोरी यांच्यामध्ये बोलणे होते. त्यानंतर अभिजित केळकर शिव आणि नेहा या दोघांना विजयाचे दावेदार पाहण्याची इच्छा असल्याचे बिग बॉसला सांगतो. तसेच हिना घरात येताच तिने टॉप टू साठी वीणा आणि नेहा हिला निवडते.
तसेच नेहा हिला 9 पैकी 8 मत ती बिग बॉसच्या ग्रँन्ड फिनालीमध्ये पोहते. तर 9 पैकी 5 मत मिळवत शिवानी ही फायनलमध्ये जाणारी दुसरी स्पर्धक ठरली आहे. मात्र घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेत आरोह, किशोरी, वीणा आणि शिव यांचे नाव नॉमिनेट झाले आहेत. फायनलमध्ये गेल्याचा आनंद नेहा आणि शिवानी मध्यरात्री साजरा करताना दिसून येतात. परंतु आरोह याला एकाही सदस्याने टॉप टू च्या प्रक्रियेत निवड न केल्याने खंत व्यक्त करतो.(Bigg Boss Marathi 2, Episode 88 Preview: बिग बॉस मराठी 2 च्या अंतिम फेरीत पोहणार्या सदस्यांचा नावांचा आज होणार उलगडा)
तर दुसऱ्या बाजूला बिचुकले यांनी केलेल्या व्यक्तव्यावरुन शिवानी संतापते. त्याचसोबत आरोह याला वीणा नकळतपणे टोचून बोलत असल्याचा राग नेहा आणि शिवानी हिच्या समोर व्यक्त करतो. परंतु वीणा आणि शिव हे दोघे आतापर्यंत घरातील सदस्यांनी कशापद्धतीने एकमेकांसोबत वागले याबद्दल बोलताना दिसून आले. तर उद्याच्या भागात प्रत्येक सदस्याला आपले किती मुल्य आहे हे ठरवायचे याबद्दल बिग बॉसला सांगायचे आहे. त्यामुळे उद्याच्या भागात काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.