Bigg Boss Marathi 2, Episode 88 Preview: बिग बॉस मराठी 2 च्या अंतिम फेरीत पोहणार्‍या सदस्यांचा नावांचा आज होणार उलगडा
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi)  च्या घरात आता सदस्यांचा प्रवास शेवटच्या टप्प्यात आला आहे. यामध्ये शिवानी सुर्वे, नेहा शितोळे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्यामध्ये रंगणारा खेळ अधिक चुरशीचा होत आहे. तर पाहुणा सदस्य म्हणून घरात असलेला अभिजीत बिचुकले पुढे किती दिवस घरात राहणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मात्र आज घरात अभिजित बिचुकले आणि शिवानीमध्ये एक शाब्दिक चकमक पहायला मिळणार आहे.तसेच 'तिकीट टू फिनाले'च्या माध्यमातून आज अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या 2 सदस्यांच्या नावांचाही उलगडा होणार आहे.

बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये सुरूवातीपासूनच अभिजीत बिचुकले वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यांसाठी चर्चेत आहेत. काल ( 20 ऑगस्ट) घरात आऊट झालेल्या सदस्यांची काही क्षणांसाठी एंट्री झाली त्यादरम्यानही अभिजित बिचुकलेंनी सुरेखा पुणेकरांवर केलेल्या खोचक टीकेनंतर घरातील सदस्यांनी बिचुकलेंवर आगपाखड केली होती. पहा आतापर्यंत काय झालंय बिग बॉस  मराठी 2 च्या घरात? 

अभिजीत बिचुकलेंवर भडकली शिवानी 

तिकीट टू फिनाले

यंदा बिग बॉस मराठी 2 च्या घरात 'तिकीट टू फिनाले' यासाठी आऊट झालेल्या नऊ सदस्यांना घरात पुन्हा बोलावून त्यांच्याकडून टॉप 2 सदस्यांची नावं घेण्यात आली. आता या टास्कद्वारा यंदाच्या आठवड्यात रंगलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेतून कोण नॉमिनेट होणार अअणि कोण तिकीट टू फिनालेद्वारे थेट अंतिम फेरीत पोहचणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आता शेवटच्या दोन आठवड्याचा खेळ बाकी आहे. त्यामुळे यंदाच्या विजेतेपदावर कोणाचं नाव कोरलं जाणार आणि कोण फिनालेच्या अवघ्या आठवडाभर आधी घराबाहेर पडणार हे आता बघावं लागेल.