Bigg Boss Marathi 2, August 20, Episode 87 Update: बिग बॉस मराठी 2 चे जुने सदस्य घरात परतले, शिव आणि वीणाच्या नात्यावरून पुन्हा कानउघाडणी
Bigg Boss Marathi 2, August 20, Episode 87 Update (Photo Credits: Twitter)

बिग बॉसने (Bigg Boss) आजच्या भागात टॉप 6 सदस्यांना एक सरप्राईज गिफ्ट देऊ केले. या निमित्ताने यंदाच्या सीझन मधील जुने सदस्य विद्याधर जोशी (बाप्पा), दिगंबर नाईक (Digambar Naik), मैथिली जावकर (Maithali Javkar), वैशाली माडे (Vaishali Made), सुरेखा पुणेकर (Surekha Punekar), माधव देवचके (Madhav Deochake), पुन्हा एकदा घरातील सदस्यांना भेटण्यासाठी एन्ट्री करतात. यावेळी बिग बॉस या पाहुण्या सदस्यांना घरातील सदस्यांपैकी अंतिम फेरीत टॉप टू च्या रुपात कोणत्याही दोन सदस्यांना निवडायला सांगतात. दरम्यान, पाहुण्या सदस्यांच्या एंट्रीच्या वेळी घरात बिचुकले सोडून सर्वांना फ्रीझ करण्यात येते व जे दोन सदस्य निवडले जातील केवळ त्यांनाच रिलीज करण्याचे असे आदेश दिले जातात. मात्र असं असलं तरी पाहुणे सर्व सदस्यांशी बोलू शकतात, ज्यात प्रत्येकजण हा शिव (Shiv Thackrey) आणि विणाच्या (Veena Jagtap) नात्यावर भाष्य करताना पाहायला मिळतो. बाप्पा व माधव शिवला अप्रत्यक्ष सल्ला देऊन खेळावर लक्ष देण्यास सांगतात.

याशिवाय आजच्या भागाच्या सुरुवातीला शिव आणि वीणा मध्ये कालच्या बिचुकले की अदालत टास्कवरून बोलणी सुरू असतात. घरातील सदस्यांनी शिव ला जोरु का गुलाम असा टॅग दिल्याने आता दोघेही दरवेळी प्रमाणे एकमेकांपेक्षा खेळाकडे लक्ष देण्याचा निर्धार करतात. तर पाहुणे सदस्य घरात येऊ लागल्यावर घरात पुन्हा एकदा हलकीशी भावनिक दृश्ये पाहायला मिळाली. माधव , सुरेखा यांच्या येण्याने शिवानी आणि नेहाला तर वैशालीच्या येण्याने शिव वीणाला रडू आले.पण नेहमीप्रमाणे या इमोशनल क्षणात बिचुकले मिठाचा खडा टाकतात.सुरेखा यांच्याशी बोलताना तुम्हाला जनतेने घराबाहेर काढले असे बिचुकले वदले आणि मग शिवानी सह घरातील सर्व सदस्यांनी त्यांच्यावर झोड घेतली.

हेही वाचा-Bigg Boss Marathi 2, August 19, Episode 86 Update: बिग बॉसच्या घरात रंगला आरोप प्रत्यारोपाचा खेळ, बिचुकले की अदालत मध्ये सदस्यांची शाळा

दरम्यान, उद्याच्या भागात उर्वरित सदस्य म्हणजेच अभिजित केळकर व हीना पांचाळ घरात एन्ट्री घेणार आहेत. बिग बॉसचा खेळ हा आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी एक सदस्य घराबाहेर पडून बिग बॉसचे टॉप 5 स्पर्धक कोण ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे