सलमान खान ने Bigg Boss 15 संदर्भात केला मोठा खुलासा; शो साठी ऑडिशन कधी होणार जाणून घ्या
सलमान खान (Image Credit: Colors)

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) शो रविवारी संपला. रुबीना दिलैक (Rubian Dilaik) ने या शोच्या ट्राफीवर आपलं नाव कोरलं. अंतिम फेरीत राहुल वैद्यला पराभूत करून तिने हा करंडक जिंकला. गेल्या साडेचार महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करून अखेर हा शो संपला. अशातंच आता सलमान खान (Salman Khan) ने ग्रँड फिनालेच्या रात्री बिग बॉस 15 बद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.

सलमानने बिग बॉस 15 संदर्भात बोलताना सांगितलं की, हा सिझन संपल्यानंतर आम्ही 6 ते 7 महिन्यांनी पुन्हा येऊ. काही महिन्यांत व्हूट सिलेक्टवर बिग बॉस 15 संबंधित ऑडिशन होतील. ज्यात प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो. तसेच सामान्य जनता स्पर्धकांना मतदान करू शकते. येत्या काळात याबद्दल अधिक अपडेट्स देण्यात येतील, असंही सलमानने यावेळी म्हटलं आहे. (वाचा - Bigg Boss 14 Winner: रुबिना दिलैक बनली बिग बॉस 14 ची विजेती; सिद्धार्थ शुक्ला, विकास गुप्ता आणि हिना खान यांनी 'अशी' दिली प्रतिक्रिया)

बिग बस शोमध्ये आलेल्या भारती सिंगनेही बिग बॉसच्या नवीन सीझनचा भाग होण्याविषयी बोललं आहे. या शोमध्ये ती जाणार आहे किंवा पाहुणी म्हणून दिसणार आहे, हे येणाऱ्या काळातचं समजेल. भारतीने सिझन 13 मध्ये देखील अशी घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर ती पहिल्याच दिवशी पाहुणी म्हणून घरात आली होती.

सलमान खान गेल्या अनेक सीझनपासून बिग बॉसचे होस्ट करत आहे. अहवालानुसार, सलमान खान या सिझनसाठी 24 कोटी फी घेत होता. सलमानने सीझन 15 संदर्भात बोलताना सांगितलं होत की, जर जर त्याची फीस 15 टक्क्यांनी वाढविण्यात आली तरचं तो या शोमध्ये दिसू शकतो.