Bigg Boss 14 Winner: रुबिना दिलैक बनली बिग बॉस 14 ची विजेती; सिद्धार्थ शुक्ला, विकास गुप्ता आणि हिना खान यांनी 'अशी' दिली प्रतिक्रिया
Boss 14 Winner Rubina Dilaik (PC - Instagram)

Bigg Boss 14 Winner: बिग बॉस शोचे होस्ट सलमान खान (Salman Khan) ने 21 फेब्रुवारी रोजी उशीरा 14 व्या सिझनमधील विजेता संपूर्ण देशासमोर जाहीर केला. रुबीना दिलैक (Rubina Dilaik) ने राहुल वैद्यला पराभूत करत बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. राहुल वैद्य हा बिग बॉस सीझन 14 चा पहिला उपविजेता ठरला आहे. तसेच निक्की तांबोळी ही बिग बॉस सीझन 14 ची दुसरी उपविजेती ठरली आहे. सलमान खानने बिग बॉस 14 चा विजेता रुबिना दिलैकची घोषणा करताचं सोशल मीडियावर #RubinaDilaik चं नाव ट्रेंड झालं. चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या आवडत्या अभिनेत्रीची प्रशंसा करण्यास सुरुवात केली.

आतापर्यंत बिग बॉसचे 14 सीझन प्रसारित केले गेले आहेत. या स्पर्धकांच्या यादीत सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि विकास गुप्ता यांचा समावेश आहे. रुबीनाने विजेतेपद मिळवल्यानंतर या तिन्ही सेलेब्सची प्रतिक्रिया काय होती हे जाणून घेऊयात... (Bigg Boss 14: राखी सावंत चा मोठा खुलासा; पैसे देण्याच्या बहाण्याने मित्राने केला होता लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न)

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

सिद्धार्थ शुक्ला

सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये दिसला होता. सिद्धार्थ शो दरम्यान चर्चेत होता. त्याने 13 व्या सीझनचं विजेतेपद जिंकलं होतं. त्याचवेळी सिद्धार्थ शहनाज गिलबरोबरच्या नात्याबाबतही बर्‍याच चर्चेत होता. सिद्धार्थने रुबीनाच्या विजयावर ट्वीट करत लिहिलं आहे की, 'रुबीना या विजयाबद्दल अभिनंदन, तुम्ही शोमध्ये खूप चांगले काम केले.'

विकास गुप्ता

विकास गुप्ता बिग बॉसच्या एकापेक्षा जास्त सीझनमध्ये दिसला आहे. विकास गुप्ता यांनी ट्वीट केले आहे, ' आणखी एक हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल बिग बॉस टीमला शुभेच्छा. अखेर 20 आठवड्यांनंतर आमच्याकडे या सीझनचा विजेता आहे. रुबीना दिलक यांना हार्दिक शुभेच्छा. '

हिना खान

हिना खानने रुबीनाचे पूर्ण उत्सहात विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. हिना खानने ट्विट केलं आहे की, 'रुबी ... रुबी .. रुबीना ..., टीम हिनाला तुझा अभिमान आहे. खूप प्रेम आणि शुभेच्छा. '

दरम्यान, रविवारी रात्री उशीरा बिग बॉस सीझन 14 चा विजेता घोषीत करण्यात आला. रुबीनाची ग्रँड फिनालेमध्ये राखी सावंत, निक्की तांबोळी, राखी सावंत, राहुल वैद्य आणि अली गोनी यांच्याशी टक्कर होती. रुबीनाच्या विजयानंतर अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर ट्वीट करत तिचं अभिनंदन केलं आहे.