Bigg Boss 13: बिग बॉस 13 पर्वासाठी सलमान खान किती मानधन घेणार? नवा आकडा घ्या जाणून
सलमान खान (Photo Credits: Twitter)

रियलिटी शो 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचे यंदा 13 वे पर्व आहे. तेराव्या पर्वासाठी स्पर्धक म्हणून विविध चेहऱ्यांशी संपर्कही केला जात आहे. दरम्यान, या शोचा होस्ट अभिनेता सलमान खान (Salman Khan) मानधन म्हणून किती पैसे घेणार याबाबतही अनेक चर्चा सुरु आहेत. या या शोसाठी सलमान खान सुमारे 400 कोटी रुपये घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता पुन्हा एकदा या मानधनाबद्दल नवा आकडा पुढे आला आहे.

पिंकविलने सूत्रांच्या माहितीने देल्या वृत्तानुसार, Bigg Boss 13 हे पर्वही नेहमीप्रमाणे 105 दिवसांचे असेल. गेल्या वर्षी हा शो होस्ट करण्यासाठी अभिनेता सलमान खान याने 11 कोटी रुपये मानधन घेतले होते. त्यावेळी सलमान खान आठवड्याचे दोन्ही एपिसोड एकाच दिवसात शूट करत होता. त्याने 2018 मध्ये (Bigg Boss 12) हा शो होस्ट करण्यासाठी 165 कोटी रुपये घेतले होते. आता Bigg Boss 13 साठी सलामानने आपले मानधन वाढवले आहे. त्याला 13 व्या पर्वासाठी हा शो होस्ट करताना प्रत्येक आठवड्यासाठी 13 कोटी रुपेय मानधनापोटी मिळणार आहेत. म्हणजेच ही रक्कम साधारण प्रति एपिसोड 6.5 कोटी रुपयांच्या घरात जाते. याचाच अर्थ या वेळी सलमान खान याचे मानधन हे 200 कोटी इतके असेन. (हेही वाचा, BIGG BOSS 13 : बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी Salman Khan किती पैसे घेणार? रक्कम घ्या जाणून)

दरम्यान, 'भारत' सिनेमातून सलमान खान नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला होता. त्याच्यासोबत कैटरिना कैफ आणि दिशा पाटनी यांची भूमिका महत्त्वाची होती. हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शीत केला होता. दरम्यन, सलमान लवकरच आलिया भट्ट हिच्यासोबत संजय लीला भंसाली याच्यासोबत 'इंशाअल्लाह' चित्रपटात दिसणार आहे.