हिंदी टेलीव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ (Bigg Boss) कडे पाहिले जाते. सध्या या शोचा 13 वा सिझन चालू आहे. शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) मुळेही या शोच्या लोकप्रियतेमध्ये बरीच भर पडली. बॉलिवूड अभिनेता सलमान खान केवळ बॉलिवूडचा सुपरस्टारच नाही, तर एक उत्तम होस्टही आहे. हे आम्ही म्हणत नाही तर सलमानचे चाहते म्हणत आहेत.
होस्ट म्हणून सलमान खानने बिग बॉस मध्ये तब्बल 10 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास गोष्टीचे औचित्य साधून कलर्स वाहिनीने सलमानच्या 10 वर्षांच्या प्रवासाचा एका व्हिडिओ सादर केला आहे. आपला हा प्रवास पाहून सलमान प्रचंड भावूक झाला. इतकेच नाही तर त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
याआधी सलमान खानने हा शो सोडण्याबद्दल अनेकवेळा वक्यव्ये केली आहेत. परंतु चाहत्यांच्या आनंदासाठी प्रत्येक वेळी तो हा शो होस्ट करण्यास तयार होतो. आता 10 वर्षांच्या प्रवासामधील या शोशी संबंधित आठवणी त्याला या शोपासून विभक्त होऊ देणार नाहीत. बिग बॉसने नुकताच एक प्रोमो रिलीज केला असून, त्यामध्ये सलमान खानच्या होस्टच्या रूपातील 10 वर्षाचा प्रवास दर्शविण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमान खानचे डोळे अश्रूंनी भरुन गेले. हा प्रवास पाहिल्यावर सलमानने बिग बॉसचे आभार मानले. बिग बॉसने यापूर्वी आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता ज्यात सलमान खान बिग बॉसच्या घरात भांडी आणि शौचालय साफ करताना दिसत आहे.
Year Ender 2019: कार्तिक आर्यन ते विकी कौशल,या बॉलीवूड Celebrities नी केलं यावर्षी Breakup Watch video
2006 मध्ये बिग बॉस या शोला सुरुवात झाली होती. या शोचा पहिला सिझन अर्शद वारसीने होस्ट केला होता, त्यानंतर अनुक्रमे शिल्पा शेट्टी व अमिताभ बच्चन यांनी दुसरा व तिसरा सिझन होस्ट केला होता. त्यानंतर चौथ्या सिझनपासून सलमान या शोशी जोडला गेला. दरम्यान, आज विकेंडचा वार आहे व घरातून एक सदस्य बाहेर जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज अरहान घरातून बाहेर जाऊ शकतो. मात्र आजचा भाग पाहिल्यावरच ते समजेल.