बिग बॉस (Bigg Boss) हा शो म्हंटला की डोळ्यासमोर वाद, भांडण एखादं वेळेस अगदी मारामारी अशी सगळे दृश्य डोळ्यासमोर आपसूकच उभी राहतात. यंदाचा बिग बॉसचा 13 (Bigg Boss 13) वा सीझन देखील या ओळखीला सार्थ ठरत आहे. आतापर्यंत अनेक भांडणातून आपली जीभ सैल सोडत घरातील स्पर्धकांनी स्वतःवर टीकास्त्र ओढवून घेतले आहे. मात्र यातून स्पर्धकांची प्रतिमा खराब होऊ नये म्ह्णून अधून मधून शो चा होस्ट सलमान खान त्यांना अनेक उपदेश देत असतो. अलीकडेच त्याने घरातील बहुचर्चित स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) याला आपला राग कंट्रोल कसा करायचा यावर एक सल्ला दिला. सलमान स्वतः जेव्हा रागावतो तेव्हा त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जमिनीवरच झोपून जातो त्यामुळे सिध्दार्थने ही असेच काही ट्राय करून पाहावे असा सल्ला त्याने दिला होता. वरवर हा सल्ला जरी बाळबोध वाटत असला तरी काही अभयस्कांच्या दृष्टीने हा खरोखरच उपयुक्त मार्ग आहे असे सध्या समोर येत आहे.
टेक्साक्स येथील एका विद्यापीठाच्या रिसर्च मधून समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादा व्यक्ती उभा असतो किंवा चालत असतो तेव्हा त्याचे डोके आणखीन सक्रिय असते त्यामुळे राग वाढू शकतो. पण आडवे झोपल्याने ही सक्रियता किंचित घटते व रागावर नियंत्रण मिळवता येते. यामागील कारण उभे राहणे ही अप्रोच मोटिव्हेशन म्हणजेच समोरच्याशी बोलण्याच्या इच्छेने युक्त शरीरावस्था आहे. याउलट उभे आडवे झोपले असताना आपली बोलण्याची इच्छा कमी होते म्ह्णूनच राग व्यक्त करणे आपोआप घटते.
(सलमान खानच्या वांद्रे येथील 'गॅलक्सी' घरात बॉम्ब; 16 वर्षांच्या मुलाने दिली खोटी माहिती)
अलीकडे प्रत्येकाच्या आयुष्यात वाढलेल्या ताणतणावामुळे कोणालाही रंगवण्यासाठी क्षणाचा अवधी देखील पुरेसा ठरतो. पण अनेकदा या रागावर नियंत्रण न ठेवल्यास आपण विचारही करणार नाही इतके नुकसान होऊ शकते. याची काळजी म्ह्णूनच हा उपाय एकदा ट्राय करून पाहायला काय हरकत आहे.. बरोबर ना?