प्राजक्ता माळी लवकरच करणार एका नव्या इनिंग ला सुरुवात; दिसणार 'या' हिंदी शो मध्ये
Prajakta Mali (Photo Credits: Instagram)

प्राजक्ता माळीसाठी नवं वर्ष नक्कीच आनंददायी ठरतंय असं म्हणायला हरकत नाही. डिझायनर जान्हवी मुलचंदा हिने तिच्या विरुद्ध केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच प्राजक्ताच्या बाजूने लागला. लगेचच तिने तिच्या फॅन्सना आणखी एक आनंदाची बातमी सांगितली. मराठी सिनेसृष्टीतील ही आघाडीची अभिनेत्री लवकरच हिंदी शोमध्ये पदार्पण करत आहे. तिच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल, प्राजक्ताने नुकतेच तिच्या सोशल मीडियाद्वारे फॅन्सना सांगितले आहे. बाॅलीलॅण्ड्स.काॅम असे तिच्या नव्या शोचे नाव असून तो एक पर्यटन संबंधित कार्यक्रम असणार आहे.

प्राजक्ता या कार्यक्रमाच्या शूटसाठी अलीकडेच युएईमध्ये गेली होत. त्यामुळे आपल्याला तिच्या या नव्या शोमध्ये युएईमध्ये चित्रीत झालेल्या हिंदी चित्रपटांच्या जागा, हॉटेल्स आणि समुद्र किनारे पाहायला मिळणार आहेत.

ती या शोचं सूत्रसंचाल करणार आहे. सध्या ती एका मराठी रिऍलिटी शोचं देखील सूत्रसंचाल करत आहे. दरम्यान, प्राजक्ताचा हा नवा ट्रॅव्हल शो येत्या मार्च महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डिझायनरला मारहाण केल्याचा प्राजक्ता माळी विरोधात असलेला खटला ठाणे सेशन कोर्टाने केला रद्द

तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्राजक्ताने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु, आता तिच्या सूत्रसंचालवरही तिचे फॅन्स खूप खुश आहेत. जुळून येति रेशीमगाठी या झी मराठी वरील मालिकेमध्ये तिने साकारलेल्या मेघनाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर खऱ्या अर्थाने जादू केली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले. तसेच नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत देखील प्राजक्ताने प्रमुख भूमिका साकारली होती.