डिझायनरला मारहाण केल्याचा प्राजक्ता माळी विरोधात असलेला खटला ठाणे सेशन कोर्टाने केला रद्द

मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याविरोधात तिची डिझायनर जान्हवी मनचंदा हिने मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला होता.

डिझायनरला मारहाण केल्याचा प्राजक्ता माळी विरोधात असलेला खटला ठाणे सेशन कोर्टाने केला रद्द
Prajakta Mali (Photo Credits: Instagram)

मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याविरोधात तिची डिझायनर जान्हवी मनचंदा हिने मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला होता. परंतु, सदर खटल्यात प्राजक्ता माळी हिला समन्स बजावण्यात आले नसतानाही, तिच्या नावाचे वाॅरंट निघाले आहे असे सांगत, सर्व प्रकारच्या माध्यमातून बातम्या देऊन तिची बदनामी केली होती असं प्राजक्ताच्या वकिलांचं म्हणणं आहे.

कनिष्ठ न्यायलयाच्या आदेशाच्या विरुद्ध प्राजक्ता माळी हिच्या वकिलांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, ठाणे जिल्हा सत्र न्यालालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून प्राजक्ता माळी हिच्याविरुद्ध असलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नाही आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशात कायदेशीर त्रूटी असल्याचे स्पष्ट केले आहे. अखेर, प्राजक्ता विरुद्ध दाखल करण्यात आलेला सदर खटला रद्द करण्यात आला आहे.

हा संपूर्ण सदर खटला प्राजक्ताच्या बाजूने ऍड.अभिषेक अवचट व प्रताप परदेशी यांनी लढवला आहे. तसेच सदर खटल्यात प्राजक्ता माळी हिची जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी केली असल्याच्या प्रकरणाबद्दल फिर्यादी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात प्राजक्ताचे वकील आहेत.

अभिनेत्री 'प्राजक्ता माळी'चा हा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले थक्क, दिल्या अशा काही कमेंट्स

दरम्यान, प्राजक्ताने देखील तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने म्हटले होते की, "जान्हवीने व्हायरल केलेले फोटो आणि वॉट्सऍप चॅटचे स्क्रिनशॉट खोटे आहेत. ती माझी फॅशन डिझायनर होती आणि कपड्यांवरून माझे तिच्याशी मतभेद झाले होते. पण तिला मी मारहाण केली नाही. तिच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. असं काही घडलं असतं तर सेटवरील लोकांनासुद्धा कळलं असतं."

(The above story first appeared on LatestLY on Jan 27, 2020 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).