Payal Rohtagi (photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) पुन्हा अडचणीमध्ये आली आहे. पायलने सोसायटी चेअरमॅन वर सोशल मीडीयामध्ये आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा/ शिव्या दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. दरम्यान या प्रकरणी सध्या तिला पुन्हा पोलिस स्टेशन मध्ये जावं लागलं आहे. पायल रोहतगीने आक्षेपार्ह भाषा वापरलेला हा व्हिडिओ सोशल मीडीयामधून हटवला आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, पायल रोहतगी वर सतात्याने इमारतीमधील इतर रहिवाश्यांसोबत भांडणं करणं, चेअरमॅनला जीवे मारण्याचे देखील आरोप आहेत. 20 जूनला झालेल्या सोसायटीच्या एजीएम मध्येही पायल सदस्य नसूनही आली होती तिला बोलण्यास मनाई करण्यात आली तेव्हा तिने शिव्या देण्यास सुरूवात केल्याचं म्हटलं जात आहे.

सोशला मीडीयामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे गोत्यात येण्याची पायलची ही काही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी देखील तिने केलेल्या अनेक पोस्ट मुळे चर्चा रंगल्या होत्या तिला जेलची देखील हवा खावी लागली आहे. यामध्ये पायलने एकदा मोतिलाल नेहरू, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दलही 2019 मध्ये आक्षेपार्ह पोस्ट केली होती. राजस्थानच्या बुंदी पोलिसांकडूनही पायलला अटक झाली होती.

पायल रोहतगी ने 'ये क्या हो रहा है?'चित्रपटाद्वारा 2002 मध्ये कलाक्षेत्रात पदर्पण केले. त्यानंतर रिअ‍ॅलिटी शो 'खतरों के खिलाड़ी 2' आणि 'बिग बॉस 2' मधूनही ती रसिकांच्या भेटीला आली होती.