अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगीला ( Payal Rohatgi) राजस्थान पोलिसांनी अहमदाबाद येथून रविवार (15 डिसेंबर) सकाळी अटक केली आहे. पायल रोहतगीने भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली होती. न्यायालयाने पायलला 24 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावत जामीन नामंजूर करण्यातआला आहे. दरम्यान पायलला बॉलिवूडमधून मात्र कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. अभिनेत्री पायल रोहतगी ,राजस्थान पोलिसांच्या ताब्यात; मोतीलाल नेहरू यांच्याविरुद्ध केलेलं विधान भोवलं.
पायल रोहतगीने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांविरोधात म्हणजेच मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. पायलने व्हिडिओ शेअर करताना केलेल्या दाव्यानुसार, मोतीलाल नेहरू यांच्या पाच पत्नी होत्या, म्हणून काँग्रेस सरकार तिहेरी तलाकच्या विरोधात होते. यासोबतच मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरू यांचे सावत्र वडील होते. असा उल्लेख केला होता. पायलने आपल्या या दाव्यात एलिना रामाकृष्णाने लिहिलेल्या आत्मचरित्राचा उल्लेख केला होता. दरम्यान अटकेची माहिती पायलने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली होती.
पायल रोहतगीचं ट्वीट
I am arrested by @PoliceRajasthan for making a video on #MotilalNehru which I made from taking information from @google 😡 Freedom of Speech is a joke 🙏 @PMOIndia @HMOIndia
— PAYAL ROHATGI & Team- Bhagwan Ram Bhakts (@Payal_Rohatgi) December 15, 2019
कोयना मित्रा ट्वीट
Change your name to Hafiz Sayeed for an hour, Cong dogs will salute you. Shame on Cong govt @INCIndia #FreedomOfSpeech #VeerSavarkar #LoserRahul https://t.co/5zFEDpQrxM
— Koena Mitra (@koenamitra) December 15, 2019
पायलच्या अटकेनंतर तिचा साथीदार संग्राम सिंहने ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्रालयाकडून मदत मागितली. मात्र त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. कोर्टाने जामीन नामंजूर केल्याने ती 24 डिसेंबर पर्यंत जेल मध्ये राहण्याची शक्यता आहे.