Payal Rohatgi (Photo Credits: Instagram)

टीव्ही अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohtagi)  हिला राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) अटक केली आहे, दरवेळीच आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत आलेल्या पायल हिने यावेळी थेट नेहरू आणि गांधी परिवारावर एका व्हिडिओच्या मार्फत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज तिच्यावर कारवाई करत तिला अटक करण्यात आली आहे. आतकेवेळी पायल ही अहमदाबाद (Ahemdabad) येथे होती. याविषयी तिच्या टीम तर्फे ट्विटरवर रीतसर पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काल वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा संदर्भ देत आक्षेपार्ह्य विधान केल्यावर पायल हिने मोतीलाल नेहरू (Motilal Nehru) यांच्यावर बनवलेला व्हिडीओ चर्चेत आला होता. काँग्रेस नेते चर्मेश शर्मा (Charmesh Sharma) यांनी या व्हिडिओवर आक्षेप घेत हा अपमान असल्याचे म्हणत तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती.

पायल रोहतगी हिच्या टीमने ट्विटरवर, 'मोतीलाल नेहरू यांच्याबाबत ऑनलाईन जितकी माहिती आहे त्याच आधारे मी एक व्हिडीओ बनवला होता, मात्र यासाठी मला अटक करण्यात आली आहे. आपले मत मांडण्यावर अशी कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची थट्टा केलेली आहे" अशा आशयाचे ट्विट केले आहे. (शिवाजी महाराजांचा जन्म क्षुद्र शेतकरी घरात झाला होता, बिग बॉस फेम पायल रोहतगीचे वादग्रस्त विधान)

पायल रोहतगी ट्विट

दरम्यान, माध्यमांच्या माहितीनुसार हा व्हिडीओ जरी आता काढून टाकण्यात आला असला तरीही यामध्ये पायल हिने नेहरू यांच्या परिवाराबद्दल अनेक वाईट टिपण्ण्या केल्याचे समजत आहे. या व्हिडिओनंतर तिची चौकशी केली असता तिने आपला वाईट असा काहीही उद्देश नसल्याचे सांगत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची माफी मागितली होती.