ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी (Mohan Joshi) यांना कोरोना (Coronavirus) लागण झाली आहे. काल (9 मे ) संध्याकाळी त्यांनी इंस्टाग्राम पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सध्या मोहन जोशी झी मराठी च्या 'अग्गबाई सुनाबाई' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत चित्रिकरण बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या तेव्हा मालिकेच्या शूटिंगसाठी अग्गाबाईची टीम गोवा मध्ये दाखल झाली होता. आता गोव्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चित्रिकरणाला असलेली परवानगी रद्द झाल्याने अग्गबाईची टीम सध्या मुंबई मध्ये परतली आहे. मुंबई मध्ये मोहन जोशींची कोविड चाचणी झाल्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आहे.
दरम्यान मोहन जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच कोविडचे दोन्ही डोस घेतले असल्याचे Times OF India च्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे. मोहन जोशींनी देखील इंस्टाग्राम पोस्ट द्वारा त्यांना कोविडची लागण झाल्याचं म्हटलं आहे तेव्हा कारणाशिवाय बाहेर पडू नका असे देखील सांगितलं आहे.
मागील वर्षी अग्गबाईच्या टीम मध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोविड ची लागण झाली होती. सुदैवाने त्या या आजारावर मात करून बाहेर पडल्या तसेच लवकर निदान झाल्याने सेटवर इतर सदस्यांनाही त्याची लागण झाली नाही. अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर अग्गबाई मालिकेत 'आजोबा' हे पात्र मोहन जोशींकडे आलं आहे. 'अग्गबाई सासूबाई' नंतर आता या मलिकेचा नवा सीझन 'अग्गबाई सूनबाई' सुरू आहे.
Entertainment Society of Goa ने गोव्यातील चित्रिकरणाला परवानगी आता नाकारल्याने अनेक मराठी मालिकांच्या टीम्स परतल्या आहेत. यामध्ये झी मराठी वरील पाहिले न मी तुला. अग्गबाई प्रमाणेच सूर नवा ध्यास नवा, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकांचाही समावेश आहे.