‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत दत्तात्रय बंडोपत कुलकर्णी परतणार, 'हे' ज्येष्ठ अभिनेते घेणार दिवंगत अभिनेते रवी पटवर्धनांची जागा
Aggabai Sasubai (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर एक वेगळाच आणि हटके विषय घेऊन आलेली मालिका 'अग्गंबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) मध्ये आता एका नव्या कलाकाराची एन्ट्री होणार आहे. या लोकप्रिय मालिकेतील दत्तात्रय बंडोपत कुलकर्णी यांची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (Ravi Patvardhan) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आधी कोरोनाचे नियम, त्यानंतर रवी पटवर्धन यांचे खालावलेली प्रकृती आणि त्यानंतर त्यांचे अकाली निधन यामुळे गेले अनेक महिने ही दत्तात्रय बंडोपत हे पात्र प्रेक्षक खूप मिस करत होते. मात्र आता लवकरच हे पात्र पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. मात्र यात रवी पटवर्धन यांची जागा घेतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi)..

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे या मालिकेत आजोबांच्या भूमिकेत झळकणार आहेत. येत्या 4 जानेवारीला होणाऱ्या भागात मोहन जोशी आजोबांच्या भूमिकेतून या मालिकेत सहभागी होणार आहेत.हेदेखील वाचा- Actor Ravi Patwardhan Passes Away: ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड; वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेचे चाहते या आजोबांची वाट पाहत होते. मात्र आता चाहत्यांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. दिवंगत अभिनेते रवी पटवर्धन यांनी आपल्या दमदार अभिनय कौशल्याने या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला होता. त्यामुळे त्यांची कमतरता कायमच प्रेक्षकांना जाणवेल. पण ते म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन... त्यामुळे मोहन जोशी आता आपल्या समोर दत्तात्रय बंडोपत कुलकर्णी यांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना "सोम्या कोंबडीच्या, अरे चप्पलचोर" हा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार आहे. नाही का!