Bigg Boss 13: बिग बॉस 13 ला दोन आठवड्यांचे Extension देण्यास मेकर्सचा नकार; जाणून घ्या कधी होणार Finale
Salman Khan on Bigg Boss 13 (Photo Credits: Voot)

बिग बॉसचा सीझन 13 (Bigg Boss 13) हा आतापर्यंतच्या सर्वांत हिट सीझन आहे. शोने आतापर्यंतचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. भारतीय टेलीव्हिजन क्षेत्रातील एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस 13 चे नाव घेतले जाते. सध्या या शोला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे हा शो आणखी चार आठवडे वाढवण्यात आला आहे.

मात्र बिग बॉसमधील प्रत्येक भागानुसार स्पर्धकांमधील ड्रामा वाढत असलेला दिसून येत आहे. अशात या शोने टीआरपीमध्येही बाजी मारली. म्हणूनच हा शो अजून दोन आठवडे वाढवावा (Two-Week Extension) असे वाहिनीचे म्हणणे आहे. मात्र यासाठी मेकर्सनी नकार दिला आहे.

बिग बॉस 13 बद्दल प्रेक्षकांमध्ये वाढलेला उत्साह पाहून, निर्मात्यांनी हा शो आणखी काही दिवस वाढवायचा निर्णय घेतला. त्यानंतर अजून दोन आठवडा हा शो एक्स्टेंड करावा असे वाहिनेचे म्हणणे आहे, त्याला मेकर्सनी नकार दिला आहे. चॅनल आणि शोच्या निर्मात्यांमध्ये एक बैठक झाली. त्यामध्ये शोला एक्स्टेंड करण्याबद्दल चर्चा झाली. या बैठकीत शोचा कालावधी न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: शो लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सलमान खान बिग बॉस 13 अर्ध्यावरच सोडण्याची शक्यता; होस्टिंगसाठी 'या' सेलेब्जचे नाव चर्चेत)

ही गोष्ट किती खरी किंवा खोटी हे माहित नाही, मात्र स्वत: सलमान खानने याची पुष्टी केली आहे. जर हा कार्यक्रम वाढविला गेला, तर आपण या शोला वेळ देऊ शकणार नाही, असे त्याने सांगितले आहे. फॅनक्लबवर असे वृत्त आहे की, 15 फेब्रुवारी रोजी बिग बॉस सीझन 13 चा भव्य फिनाले होणार आहे. जर शो वाढविला तर फिनाले 28 फेब्रुवारी किंवा 1 मार्च रोजी होईल. मात्र बिग बॉसकडून शो वाढविणे किंवा नाही याबद्दल अजूनतरी अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.