Big Boss Marathi 2 Promo ची घोषणा; महेश मांजरेकर 21 एप्रिलला घेऊन येणार 'बिग बॉस मराठी 2' चा पहिला प्रोमो
BBM 2 Promo (Photo credits: Twitter)

BBM 2 Promo: बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांना बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) ची प्रतिक्षा होती. अपेक्षेनुसार चाहत्यांना नाराज  न करता काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी 2 ची घोषणा करण्यात आली आहे. उद्या ( 21 एप्रिल ) दिवशी महेश मांजरेकर बिग बॉस 2 चा पहिला प्रोमो (Bigg Boss Marathi 2 Promo) घेऊन येणार आहेत. त्याची घोषणा आज महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट्वरून केली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासातच बिग बॉस 2 च्या चाहत्यांना नव्या पर्वाबद्दल मोठी हिंट मिळणार आहे. Bigg Boss Marathi Season 2: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच मराठी बिग बॉस सिझन 2; पाहा टीझर

महेश मांजरेकर यांचे ट्विट

आज महेश मांजरेकरांचा मराठमोळ्या अंदाजातील गावरान लूक मधील एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्या सोबत “चर्चेला उधाण येणार... कारण मी घेऊन येत आहे #BigBossMarathi2 चा प्रोमो... उद्या... Stay Tuned” असे कॅप्शन लिहले आहे. यंदाचे पर्वही महेश मांजरेकर होस्ट करतील यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. Bigg Boss Marathi Season 2: 'बिग बॉस'चं घर आता मुंबईत?

बिग बॉस मराठी 2 ची घोषणा झाल्यापासून यंदाच्या पर्वात कोण कोणते सेलिब्रिटी झळकतील याचा अंदाज आणि चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियामध्ये रंगत आहेत. यामध्ये  माझ्या नवर्‍याची बायको फेम रसिका सुनील पासून राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील कलाकारांची नावं चर्चेमध्ये आहेत. लवकरच कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी 2 हे नवं पर्व रंगायला सुरूवात होणार आहे.