'मुलगी झाली हो' मालिकेतील साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारणारे किरण माने यांना कोरोनाची लागण, सोशल मिडियाद्वारे दिली माहिती
Mulgi Jhali Ho (Photo Credits: Instagram)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठेवण्यात आलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत पुढे वाढविण्यात आला आहे. यादरम्यान राज्यात मालिकांचे शूटिंग करता येणार नाही म्हणून अनेक मालिकांचे चित्रिकरण राज्याबाहेर होत आहे. या दरम्यान गुजरातमध्ये शूटिंग सुरु असलेल्या स्टार प्रवाह (Star Pravah) वरील 'मुलगी झाली हो' (Mulgi Jhali Ho) या मालिकेत एका अभिनेत्याला कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाली आहे. मालिकेत साजिरीची भूमिका साकारणारे किरण माने यांना कोरोाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मिडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

अनपेक्षितपणे मलाही गाठलं त्यानं. गुजरातमधून माझ्या माणसांत आलोय. सातार्‍यात देवासारखी माणसं जोडली, ती मनापासून काळजी घेतायत. तुमचं प्रेम राहूद्यात सोबत.. चुटकीसरशी ‘निगेटिव्ह’ होऊन दाखवतो ! एकाकीपणात तुमची साथ मोलाची असेल” अशी फेसबुक पोस्ट किरण माने यांनी केली आहे. यावर मानेंचे सहकारी, मित्र आणि चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे.हेदेखील वाचा- Rubina Dilaik Tests Postive for COVID-19: बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक ला कोरोना विषाणूची लागण; म्हणाली, एक महिन्यानंतर करेल प्लाझ्मा डोनेट

Kiran Mane Post (Photo Credits: Facebook)

अभिनेता किरण माने‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारत आहे. कणखर, प्रेमळ, दयाळू आणि तितकेच मेहनती अशा स्वभावाच्या साजिरीच्या वडिलांची भूमिका ते साकारत आहेत.

याआधी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका, माझ्या मित्राची गर्लफ्रेंड, स्वराज्य हे मराठी चित्रपट केले आहेत. तसेच अपहरण या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहेत. दरम्यान आतापर्यंत मराठीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मराठीतील क्युट जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांचाही समावेश आहे.