Rubina Dilaik Tests Postive for COVID-19: बिग बॉस 14 ची विजेती  रुबीना दिलैक ला कोरोना विषाणूची लागण; म्हणाली, एक महिन्यानंतर करेल प्लाझ्मा डोनेट
Rubina Dilaik (PC - Instagram)

Rubina Dilaik Tests Postive for COVID-19: कोरोना विषाणूने संपूर्ण देशात कहर केला आहे. यापूर्वी मनोरंजन जगातील अनेक कलाकारांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक (Rubina Dilaik) चे नावही आता या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. रुबीना दिलैकची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यासंदर्भात तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

रुबीनाने स्वतः सोशल मीडियावर तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. रुबीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी नेहमी सकारात्मकतेकडे पाहत असते. आता मी एक महिन्यानंतर प्लाझ्मा दान करण्यास सक्षम असेल. कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यामुळे घरात 17 दिवस क्वारंटाईन राहणार आहे. गेल्या पाच-सात दिवसात जो कोणी माझ्या संपर्कात आला त्याने त्याची कोरोना चाचणी करुन घ्यावी.' (वाचा - कोविड-19 रुग्णांसाठी Sonu Nigam चा मदतीचा हात; Oxygen Cylinders करणार दान)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

रुबीना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बर्‍याचदा रुबीनाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अलीकडेचं रुबीनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये रुबीना मिडी परिधान करुन नाचताना दिसली होती. परंतु, तिला त्यात आरामदायक वाटलं नाही. म्हणून तिने नंतर ड्रेस बदलला आणि मोठ्या उत्साहाने पुन्हा डान्स केला.