देशभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) धुमाकूळ सुरु आहे. या भयंकर संकटात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. यात आरोग्य यंत्रणांवर प्रचंड भार पडत आहे. ऑक्सिजन आणि अन्य आरोग्य सुविधांचा तुटवडा यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई (Mumbai) मध्ये कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे साहजिकच आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. या संकटाच्या काळात बॉलिवूड गायक सोनू निगम (Sonu Nigam) ने आपल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
मुंबई मधील ऑक्सिजनची कमतरता भागवण्यासाठी सोनू निगम आपल्या जोडीदारासह ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करणार आहे. याची महिती सोनू निगम याने इंस्टा पोस्टद्वारे दिली आहे. (माझ्या नादी लागलास तर, मरीना कंवरचा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर पब्लिश करील; गायक सोनू निगम यांचा भूषण कुमार ला इशारा)
पहा पोस्ट:
View this post on Instagram
सोनू निगम ने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "हा काळ समस्यांनी भरलेला आहे आणि याचा सामना आपल्याला धैर्याने कराचयचा आहे. या आपण सर्व एकमेकांचा हात पकडून आपले योगदान देऊया आणि प्राण वाचवूया. क्रिशिव आणि मी इमरजन्सीच्या वेळी ऑक्सिजन सिलेंडर पुरवून मदत करणार आहोत. आमच्या प्रार्थना तुमच्या कुटुंबियांसोबत आहेत."
सोनू निगम आणि त्याच्या टीमकडून पुरवण्यात येणारे ऑक्सिजन सिलेंडर अॅम्बुलन्स, इमरजन्सीच्या ठिकाणी वापरण्यात येतील. दरम्यान, सोनू निगम सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असून विविध मुद्द्यांवर आपले मतप्रदर्शन करत असतो.