Kaun Banega Crorepati 11 Poster (Photo Credits: Twitter)

KBC 13 Registration 2021: अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण KBC 13 च्या रजिस्ट्रेशनला आजपासून सुरुवात होणार आहे. हा शो जेव्हा सुरु होतो तेव्हा हजारो लोकांना हॉट सीटवर बसण्याची इच्छा होते. सध्याच्या 12 सीजनमध्ये काही जण करोडपती सुद्धा झाले आहेत. अशातच आता तुम्ही नशीब आजमवण्याचा विचार करत असल्यास तर तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. येथे आम्ही तुम्हाला केबीसीच्या 13 व्या सीजन संदर्भातील रजिस्ट्रेशनच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत.

सोनी टीव्ही कडून सोशल मीडियात अशी माहिती दिली आहे की, कौन बनेगा करोडपती 13 संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात असे म्हटले की, प्रयत्न, मेहनत आणि अभ्यास तुम्हाला हॉट सीट पर्यंत घेऊन येऊ शकतो. अमिताभ बच्चन यांना भेटण्यासह करोडपती बनण्याची संधी मिळवा. केबीसी13 सीजनसाठी रजिस्ट्रेशन करुन काही प्रश्नांची उत्तरे द्या.(Amitabh Bachchan यांनी एका पक्ष्याचा सुंदर व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना दिल्या Mother's Day च्या शुभेच्छा, Watch Video)

Tweet:

केबीसी 13 साठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देण्यासाठी SonyLiv अॅप डाऊनलोड करावा लागणार आहे. येथे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येणार आहेत. यासाठी अॅपवर लॉगइन करणे गरजेचे आहे. अॅप व्यतिरिक्त www.sonylive.com या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही केबीस 13 साठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता.