Amitabh Bachchan यांनी एका पक्ष्याचा सुंदर व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना दिल्या Mother's Day च्या शुभेच्छा, Watch Video
Amitabh Bachchan Mothers day special Video (Photo Credits: Instagram)

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आज मातृदिनानिमित्त (Mother's Day) आपल्या चाहत्यांना थोड्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आज सोशल मिडियावर मातृदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक जण आपले आईसोबत फोटो शेअर मातृदिनाच्या शुभेच्छा देत आहे. मात्र बिग बी एक पक्षिणीचा व्हिडिओ शेअर करुन लोकांना आईचे महत्व पटवून दिले आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवस हा 'मातृदिवस' म्हणून साजरा केला पाहिजे असे या व्हिडिओखाली म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण या व्हिडिओला भरभरून कमेंट्स देत आहे.

या व्हिडिओमध्ये पक्षाच्या मादी जातीने आपल्या पिलांना जन्म दिला असून त्या पिलांची अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी तिने त्यांना आपल्या पंखाखाली घेतले आहे. दरम्यान तिच्यावरून ट्रॅक्टर जातो. ट्रॅक्टर येतानाची चाहुल लागताच ती आपल्या पंखांच्या जोरावर आपल्या पिल्लांचे कसे संरक्षण करते हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.हेदेखील वाचा- Mother's Day निमित्ताने Kareena Kapoor ने तैमुरसह शेअर केला आपल्या दुस-या बाळाचा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

हृदयाला स्पर्शून जाणारा हा व्हिडिओ पाहताच आपोआपच सर्वांना आईचे महत्व कळेल. अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वर शेअर करुन सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान आज मातृदिनाचे औचित्य साधून कियारा आडवाणी, मलायका अरोरा खान, शिल्पा शेट्टी ने देखील आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करुन सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दुस-यांदा आई झालेल्या करीना कपूर हिने आपल्या मुलांचा फोटो शेअर करत सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.