Taimur Ali Khan and his Brother (Photo Credits: Instagram)

मातृदिनानिमित्त आज सर्व सेलिब्रिटी देखील आपल्या आईसोबत हा दिन साजरा करत आहे. ज्यांना लॉकडाऊनमुळे आपल्या आईला भेटता येत नाही. त्या आपल्या आईचा सोशल मिडियाला फोटो शेअर करुन तिला मातृदिनाच्या शुभेच्छा देत आहे. त्याचबरोबर ज्या अभिनेत्री नुकत्याच आई झाल्या त्या आपल्या बाळांसोबतच फोटो शेअर करत आहे. अभिनेत्री करीना कपूरनेही (Kareena Kapoor Khan) आपल्या बाळांचा फोटो शेअर करुन सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्य म्हणजे सर्वांना उत्सुकता लागलेल्या आणि ज्याची झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर असलेल्या करीना कपूरच्या दुस-या बाळाची झलक देखील पाहायला मिळाली.

या फोटोमध्ये तैमुरने (Taimur Ali Khan) आपल्या छोट्या भावाला मांडीवर घेतले आहे. या फोटोमध्ये त्याच्या छोट्या भावाची हलकीशी झलक दिसत आहे. या दोघांचा फोटो शेअर करुन करीनाने त्याखाली सुंदर कॅप्शन लिहिले आहे.हेदेखील वाचा- Mother's Day 2021: मदर्स डे निमित्त क्रांती रेडकर, श्रेया बुगडे, सिद्धार्थ जाधव यांसह अन्य मराठमोळ्या सेलिब्रिटींनी शेअर केले आईसोबतचे Photos!

"आज आशेवर संपूर्ण जग टिकून आहे आणि माझा येणारा काळ चांगला असले यासाठी मला हे दोघे मला या गोष्टीसाठी प्रेरणा देतात" असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

याचबरोबर कियारा आडवाणी, मलायका अरोरा खान, शिल्पा शेट्टी ने देखील आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करुन सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान माधुरी दीक्षित, क्रांती रेडकर, श्रेया बुगडे, सायली संजीव, मिथिला पालकर, रुपाली भोसले, मयुरी देशमुख, उर्मिला निंबाळकर, सिद्धार्थ जाधव, स्वप्निल जोशी मराठमोळ्या अभिनेत्रींनी आईसोबतचे फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.