KBC 13: गोलकीपर PR Sreejesh समोर अमिताभ बच्चन यांचा हॉकीचा खेळ; पहा मजेशीर व्हिडिओ
KBC 13 (Image Credits: Sony TV)

केबीसी 13 (KBC 13) मध्ये शुक्रवारचा दिवस अत्यंत खास आहे. कारण यंदा शो मध्ये टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) मध्ये गोल्ड मेडल (Gold Medal) विजेता नीरज चोपडा आणि भारतीय हॉकी गोलकीपर श्रीजेश (PR Sreejesh) हजेरी लावणार आहेत. ज्यांचे काही धमाकेदार व्हिडिओ यापूर्वी समोर आले आहेत. या बिग बीं सोबत दोघे ऑलिंपिक स्टार्स धम्माल करताना दिसत आहेत. यातच आता शो चा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात बिग बी (Big B) या दोघांकडून हॉकी आणि जेवलिन थ्रो च्या टेक्निक्स शिकताना दिसत आहेत. (KBC 12: दिल्लीची Nazia Nasim ठरली यंदाच्या सीजनची पहिली करोडपती; पहा आनंदी क्षणांचा धमाकेदार Video)

या व्हिडिओत बिग बी सर्वप्रथम श्रीजेशला गोलकीपर बनवून गोल करण्याचा प्रयत्न करतात. अमिताभ बच्चन यांचा हा प्रयत्न अतिशय चांगला राहिला आहे. त्यानंतर महानायक गोल्डन बॉय नीरज चोपड़ा कडून जेवलिन थ्रो शिकताना दिसत आहे. या वयातही दोन्ही खेळाडूंकडून शिकण्याची बिग बींची जिद्द वाखाण्याजोगी आहे. (KBC Season 13: अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपति शो मध्ये यंदा काय असणार खास)

पहा व्हिडिओ:

या एपिसोडमध्ये नीरज चोपड़ा आणि श्रीजेश स्वत:बद्दलच्या काही खास गोष्टी शेअर करणार आहेत. हा खास एपिसोड आज रात्री सोनी टीव्ही वर प्रसारित होईल. लोकप्रिय शो चा हा एपिसोड प्रेक्षकांना नक्कीच भावेल, यात काही शंका नाही.