
KBC Season 13: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लोकप्रिय टीव्ही शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजपासून केबीसी च्या सीजन 13 ला सुरुवात होणार आहे. अमिताभ बच्चन सिद्धार्थ बसू (Siddharth Basu) यांच्याशी शोच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बोलताना या एपिसोडमध्ये दिसतील. यात बिग बी सिद्धार्थ बसु सोबत रॅपिड फायर राऊंड देखील खेळतील. दरम्यान, गेल्या वर्षी कोविड-19 संकटामुळे प्रेक्षकांना स्टुडिओ मध्ये मनाई करण्यात आली होती. परंतु, यंदा कोविड नियमांचे पालन करत प्रेक्षक शो चा आनंद घेऊ शकतात.
शो च्या पहिल्या एपिसोडमध्ये बिग बी कौन बनेगा करोडपतिच्या 21 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीविषयी बोलतील. तसंच शो सुरु करण्यापूर्वी सिद्धार्थ बसू यांच्या डोक्यात शो बद्दल छोटीशी कल्पना होती. मात्र शो सुरु झाल्यानंतर तो प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्याने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. त्याचबरोबर निर्मात्यांनी 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेयर' वर कसे आणले, एकंदर कौन बनेगा करोडपति चा 21 वर्षांचा प्रवास, यशस्वी कारकीर्द, त्यामागची कल्पना, ती घडण्याचा प्रवास या सगळ्यावर पहिल्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला जाणार आहे. दरम्यान, शो सुरु झाला त्यावेळेस टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 12 वर्षांचा तर टोकियो ऑल्मपिक 2020 मध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा 3 वर्षांचा होता. (KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना चाहत्याकडून मिळाली अनपेक्षित भेट, पाहून बिग बी ही झाले भावूक)
नवीन हंगामात एलईडी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीचा वापर दिसेल एकाच पायरीवर केला जाईल. तर टाइमरला 'धक-धक जी' असे नाव देण्यात आले आहे. 'शानदार फ्रायडे' या सेगमेंट अंतर्गत सेलिब्रिटी शुक्रवारी शोची शोभा वाढवतील. 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' हे 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट - ट्रिपल टेस्ट' मध्ये बदलण्यात आले आहे, ज्यामध्ये स्पर्धकाला तीन योग्य जीके उत्तरे द्यावी लागतील. 'ऑडियन्स पोल'च्या लाईफलाईन या हंगामातही पुनरागमन केले आहे.