Prajakta Mali's Fans Get Upset: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या सोज्वळ लुकमुळे चाहते नेहमीच तिच्या प्रेमात पडतात. 'जुळून येति रेशीमगाठी' मधील तिच्या मेघना या पात्राने तर अनेकांची मने जिंकली. परंतु, आता मात्र तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. पण यावेळी प्रेक्षकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त करणारे मेसेज तिला पाठवले आहेत. परंतु, तिचे फॅन्स नक्की का तिच्यावर नाराज झाले? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर पाहूया नक्की काय घडलं ते...
प्राजक्ता ने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. आणि हा फोटोच पाहून तिचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, असं देखील काही नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर कॅमेन्टच्या रूपात म्हंटलं आहे.
प्राजक्ता तिचा फोटो शेअर करताना #Throwback लिहीत पोस्ट केला. तिचा बोल्ड लुक आपल्याला या फोटोत पाहायला मिळतो. परंतु, प्राजक्ताचा हा बॅकलेस फोटो मात्र नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नाही.
प्राजक्ताच्या या फोटोवर एका फॅन ने लिहिलंय की 'तुझे सगळे फोटो छान असतात, पण हा आम्हाला आवडला नाही' तर 'प्रसिद्धीसाठी तुला असा फोटो पोस्ट करण्याची गरज नाही', असा टोलाही एका फॅन ने प्राजक्ताला लगावला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माचा ‘ग्लॅमरस सिरदर्द’ बोल्ड लूक व्हायरल; पाहा हॉट फोटो
दरम्यान, काही महिन्यांपासून प्राजक्ता एका वेगळ्या कारणामुळे पण चर्चेत आहे. तिच्या फॅशन डिझायनरने मारहाण करण्याचे आरोप तिच्यावर केले आहेत.