Ekta Kapoor Ganesh Visarjan: एकता कपूरच्या घरी होणार 5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन; अनेक सेलेब्जनी लावली हजेरी (See Photo)
जितेंद्र कपूर (Photo Credit : Yogen munabhai)

22 ऑगस्ट रोजी सर्वत्र गणपतीचे आगमन झाले. मोठ्या भक्तिभावाने मात्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव (Ganeshotsav 2020) साजरा होत आहे. या उत्सवाचा आजचा पाचवा दिवस. अनेक ठिकाणी आज गणपतींचे विसर्जन केले जाते. बॉलिवूडचे अनेक सेलब्ज आपल्या घरी गणपती बसवतात, शिल्पा शेट्टी, सलमान खान, ऋतिक रोशन यांच्यासह यामध्ये अजून एक महत्वाचे नाव आहे ते म्हणजे एकता कपूर (Ekta Kapoor). एकता कपूरच्याही घरी गणपतीचा फार मोठा उत्सव साजरा होतो. आज 5व्या दिवशी एकता कपूरच्या घरच्या गाणपतीचे विसर्जन होणार आहे, त्या आधीच्या तयारीचे  काही फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

गणपती विसर्जनासाठीची तयारी एकता कपूरच्या घरी पूर्ण झाली आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी इंडस्ट्रीमधील काही मंडळींनी एकताच्या घरी हजेरी लावली. यामध्ये टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि तिचा पती रोहित रेड्डी, आपल्या मुलांसह  शबीर अहलुवालिया आणि कांची कौल, रिधी डोगरा, अन्नू प्रिया गोएंका यांचे दर्शन झाले. या सोबतच जितेंद्र कपूर, शोभा कपूर, लक्ष्य कपूर हे देखील दिसून आले. या फोटोमध्ये दिसत आहे की, गणपती विसर्जनासाठी एका थोडा टेम्पो फुलांच्या माळांनी सजवला आहे. यासोबत एकता कपूरच्या घराचे गेटही फुलांच्या माळांनी मढले आहे.

पहा फोटो -

(हेही वाचा: Ankita Lokhande च्या घरी गौराईचे आगमन, आईसोबत करतेय गौरी पूजनाची तयारी, Watch Video)

दरम्यान, याआधी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ने रविवारी आपल्या घरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले. यावेळी तिने विसर्जन मिरवणूकीत आपले पती राज कुंद्रा आणि मुलासोबत डान्स केला. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा हा डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यासोबत अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) ने आपल्या कुटूंबासह त्याच्या मुंबईतील घरात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे इको फ्रेंडली पद्धतीने विसर्जन केले. ज्यात त्याने त्याच्या कुटूंबासोबत मिळून घरात एका टपमध्ये आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन केले.