सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाने खूपच कोलमडून गेलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्या घरी गणरायाचे आगमन झाल्याने सध्या ची फार आनंद आहे. यावर्षी ती आपल्या लाडक्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहात होती असेही तिने आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितले होते. त्यातच आज ज्येष्ठागौरी आवाहन (Jyeshta Gauri Avahan) असल्या कारणाने अंकिता आपल्या आईसोबत म्हणजेच वंदना फडणीस लोखंडे (Vandana Phadnis Lokhande) यांच्यासोबत गौरी पूजनाची (Gauri Pujan) जय्यत तयारी करताना दिसत आहे. हा तयारीचा व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत अंकिता व तिची आई छान साडीमध्ये मराठमोळ्या अंदाजात नटलेल्या दिसत आहेत. यात त्या दोघी गौराई आणण्यापासून ती छान सजविताना दिसत आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशीच तिने आपल्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाल्याचे सांगत छान फोटोज शेअर केले होते. त्यानंतर आज तिने गौरी पूजनाच्या तयारीचे छान व्हिडिओ शेअर केले आहेत. Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री अंकिता लोखंडे ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI कडे देण्याच्या आदेशावर केले 'हे' ट्वीट
दरम्यान सुशांत सिंह राजपूत प्रकरण CBI कडे गेल्याने अंकिता लोखंडे प्रचंड खूश आहे. सत्याचा विजय झाला अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया सोशल मिडियावर शेअर केली होती.