Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सोशल मिडीयावर पोस्टर व्हायरल (Video)
Bigg Boss Marathi 2 | (Photo Credit: Twitter)

भारतीय टेलीव्हिजन क्षेत्रातील एक वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस (Bigg Boss) कडे पाहिले जाते. इंग्रजीमधील 'बिग ब्रदर'च्या धर्तीवर हा शो भारतात सुरु झाला. अल्पावधीत हिंदीमध्ये हा शो लोकप्रिय झाल्यानंतर, देशातील इतर अनेक भाषांमध्ये या शोने धुमाकूळ घालायला सुरुवात कली. मराठीमध्ये दोन वर्षांपूर्वी हा शो सुरु झाला. बिग बॉस मराठीचे (Bigg Boss Marathi) पहिले पर्व प्रचंड गाजले. त्यानंतर दुसऱ्या पर्वानेही लोकांची मने जिंकली होती.

आता सोशल मिडीयावर बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3) पर्वाची चर्चा सुरु आहे. राजश्री मराठीने याबाबत एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

पहा राजश्री मराठीचा व्हिडीओ -

राजश्री मराठीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, बिग बॉस 3 चे पोस्टर व्हायरल होत असल्याचे सांगितले आहे. या पोस्टरवर अंतराळातील थीम बनवली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वाची थीम अंतराळ असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र हे पर्व कधी सुरु होणार, यामध्ये कोण सदस्य भाग घेणार याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. बिग बॉस मराठीचे पहिले पर्व 15 एप्रिल रोजी सुरु झाले होते. तर दुसरे पर्व 26 मे रोजी सुरु झाले होते. आता याच दरम्यान तिसरे पर्व सुरु होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरु राहणार; पसरलेल्या अफवांवर स्वतः अमोल कोल्हे यांनी दिले स्पष्टीकरण (Video))

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात मेघा धाडे विजयी ठरली होती. त्यानंतर दुसऱ्या पर्वात शिव ठाकरेने बाजी मारली होती. आता प्रेक्षक वाट पाहत आहेत तिसऱ्या पर्वाची. दोन्ही पर्वातील अनेक सदस्य अनेक कारणांसाठी लोकप्रिय ठरले होते. यातील अनेक टास्क आणि घडणारा ड्रामा प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आता उत्सुकता आहे ती तिसऱ्या पर्वात काय खास असेल हे जाणून घेण्याची.