‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरु राहणार; पसरलेल्या अफवांवर स्वतः अमोल कोल्हे यांनी दिले स्पष्टीकरण (Video)
स्वराज्यरक्षक संभाजी (Photo credit : Zee5)

गेल्या काही दिवसांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakhsak Sambhaji) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशी चर्चा सुरु आहे. याबाबत अनेक माध्यमांनी बातम्या दिल्या होत्या. मात्र आता स्वतः खा. डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी ही माहिती पूर्णतः चुकीचे असल्याचे सांगतले आहे. अमोल कोल्हे यांनी सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अव्याहतपणे दाखवला जाणार असून, त्यानंतरच ही मालिका संपेल असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. 'एक प्रवास कधीच न विसरता येणारा' असे लिहून हा व्हिडीओ पोस्ट कला गेला होता. त्यावरून अनेकांनी ही मालिका संपणार असा अंदाज लावला.

अमोल कोल्हे यांचे स्पष्टीकरण -

अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यावर शरद पवार हे मालिकेत हस्तक्षेप करत आहेत, मालिकेत काय दाखवावे याचा निर्णय ते घेत आहेत अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या होत्या. मात्र ही गोष्टही पूर्णतः चुकीचे असल्याचे कोल्हे यांनी सांगितले आहे. आपल्या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे म्हणतात, 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमध्ये शरद पवार यांना गोवण्यात येत आहे, त्याचा मी निषेध करतो. या मालिकेबाबत ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्या पूर्णतः चुकीच्या आहेत. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता ही मालिका सुरु राहणार आहे. कोणाच्या दबावामुळे ही मालिका बंद होत आहे, अशा माहितीमध्ये काही तथ्य नाही. जो कोणी अशा बातम्या पसरवत आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (हेही वाचा: Remember Amnesia: ‘स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील कोंडाजी फर्जंद उर्फ आनंद काळे यांची हॉलीवूडमध्ये वर्णी; पहा टीजर)

त्यानंतर त्यांनी शेवटी, छत्रपती संभाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास दाखवूनच ही मालिका बंद होणार असे सांगितले आहे. त्यामुळे आता या मालिकेबाबत पसरलेल्या अफवांवर पडदा पडला आहे.