Bigg Boss Marathi 2 Episode 53 Preview: बिग बॉसच्या घरावर मोठे संकट, पडणार सांकेतिक खून; जाणून घ्या काय आहे आजचे साप्ताहिक कार्य
Bigg Boss Marathi 2 Episode 53 Preview (Photo Credit : Voot)

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस च्या (Bigg Boss Marathi 2) घरातील खेळी काही अंशी बदलली आहे. कोणत्याही सदस्याचा कोणावरही विश्वास राहिला नाही. तसेच देण्यात येणाऱ्या टास्कच्या नाविण्यतेमुळे बिग बॉस पाहण्याची मजा वाढली आहे. रुपाली आणि वीणा यांच्यामध्ये रंगलेल्या कप्तानपदाच्या टास्क लोकांनी एन्जॉय केला, आता आज बिग बॉसच्या घरावर मोठे संकट येणार आहे, आणि त्यातून बाहेर पडायला ‘मर्डर मिस्ट्री’ हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. हे कार्य पुढच्या आठवड्यासाठीच्या कप्तानपदासाठी महत्वाचे असणार आहे.

तर आज बिग बॉसच्या घरात संकेतील खून होणार आहेत. अभिजितच्या अचानक गायब होण्याने या टास्कला सुरुवात होणार आहे. प्रत्येक बझरवेळी एक खून होईल. ज्या सदस्याचा खून होईल तो सदस्य कप्तानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडणार आहे. गार्डन एरियामध्ये एक बूथ असणार आहे, बझर वाजल्यावर जे दोन सदस्य त्य बूथ समोर आधी पोहचतील, त्यांना प्रतिस्पर्धी सदस्यांच्या खुनाची सुपारी देण्याची संधी मिळणार आहे. यात सदस्यांना खुनी अथवा सामान्य नागरिक होण्यासाठी एका कसोटी पार पाडावी लागणार आहे. (हेही वाचा: बिग बॉसच्या घरात समुद्रमंथनातून कलश निर्मिले, रुपाली भोसले हिस कॅप्टनसी देऊन गेले)

याच सारखा टास्क मागच्या सीझनमध्येही खेळला गेला होता आणि त्यावेळी हा टास्क प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळे या सीझनमधील सदस्य हा टास्क कसा खेळतील, कोणाचे कसे खून होतील  हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.