![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/08/Untitled-design-31-1-380x214.jpg)
गेल्या दोन भागांमध्ये आपण बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहिलात. आता सर्व सदस्य काही कालावधीसाठी का होईना पण एकत्र आले आहेत. आजच्या सकाळची सुरुवात सर्वजण एकत्र बसून नाश्ता करण्याने होते. त्यानंतरही सदस्य एकत्र थट्टा मस्करी करतानाही दिसतात. त्यानंतर घरात बाहेर गेलेले सदस्य परत येण्याला सुरुवात होते. सुरुवातीला अभिजित आणि वैशाली यांची एन्ट्री होते. पहिल्यांदा वैशाली आणि नेहा एकंदर झालेल्या गोष्टींचा आढावा घेतात. इथे वैशाली नेहाला ती किती तगडी सदस्य आहे ते सांगते. अभिजित आणि वैशाली घरात आल्याने सर्व सदस्य शिवला वीणावरून चिडवू लागतात. तसेच अभिजित आणि वैशाली त्यांचे बाहेरचे अनुभवही शेअर करतात.
त्यानंतर बाप्पा आणि दिगंबर घरात येतात. ते आल्यावर परत गप्पा गोष्टी सुरु होतात. यावेळी शिव आणि वीणा अभिजितकडे घरात घडलेल्या गोष्टींबद्दल तक्रार करतात. इथे सर्वात जास्त तक्रारी शिवानीबद्दल असतात. त्यानंतर घरात रुपाली आणि हीनाची एन्ट्री होते. आल्याआल्या वीणाने मैत्री ठेवण्याबाबत पत्रकार परिषदेत आपले नाव घेतले नाही यावर हीना चिडते. आपला राग ती वीणा आणि शिवकडे व्यक्त करते. या दरम्यान वीणा आणि रुपाली यांच्यामधील दुष्मनी सर्वत्र स्पष्टपणे जाणवते. त्यानंतर माधव आणि बिचुकले यांची घरात एन्ट्री होते. या दोघांच्या येण्याने घरात एक उत्साह संचारलेला दिसतो. बिचुकले आता सर्व एपिसोड बाहेरून बघून आल्याने घरातील सदस्यांवर ते उपहासात्मक टिपण्णी करतात.
शेवटी घरात सुरेखा ताई आणि मैथिली यांची एन्ट्री होते. बऱ्याच दिवसानंतर पराग सोडून घरातील सर्व सदस्य एकत्र आल्याने घरात प्रचंड मौज, मस्ती चालू आहे. त्यानंतर घरात बिग बॉसकडून 'बीबी अॅवॉर्ड नाइट’ हा पुरस्कारांबाबत एक टास्क दिला जातो. यामध्ये विविध पुरस्कारांसाठी कोण योग्य उमेदवार आहे हे सदस्यांनी सांगायचे आहे. आरोह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो तर वैशालीच्या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात होते. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 2, August 29, Episode 96 Update: बिग बॉसच्या घरात रंगले शिवानीचे बर्थडे सेलिब्रेशन; सदस्यांनी पाहिला त्यांचा आतापर्यंतचा थक्क करणारा प्रवास)
पाहिला पुरस्कार असतो, सर्वोत्कृष्ट ‘आता माझी सटकली’ पुरस्कार. यामध्ये शिवानी, नेहा आणि बिचुकले यांना नामांकने मिळतात. सर्वानुमते हा पुरस्कार बिचुकले यांना देण्यात येतो, जो शिवानी त्यांना प्रदान करते.
त्यानंतर घोषणा होते सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार – यामध्ये बाप्पा-सुरेखा, शिव-वीणा, नेहा-शिवानी, हीना-बिचुकले, बिचुकले-शिवानी यांना नामांकने मिळतात. पुरस्कार मिळतो तो वीणा आणि शिव यांना. अभिजित आणि वैशाली तो त्यांना प्रदान करतात.