Bigg Boss Marathi 2, August 29, Episode 96 Update: बिग बॉसच्या घरात रंगले शिवानीचे बर्थडे सेलिब्रेशन; सदस्यांनी पाहिला त्यांचा आतापर्यंतचा थक्क करणारा प्रवास
Bigg Boss Marathi 2, August 29, Episode 96 (Photo Credit : Colors MArathi)

बिग बॉसच्या फिनालेचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. सध्या सदस्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचे व्हिडीओ दाखवले जात आहेत. काल शिवानी, शिव आणि किशोरी यांच्या प्रवास आपण पहिला. आजच्या भागाची सुरुवात शिवानीच्या बर्थडे सेलिब्रेशनने होते. किशोरी शिवानीला ओवाळतात व शिवानी केक सारखा एक पदार्थ कापते. त्यानंतर आरोहचा प्रवास दाखवणे सुरु होते. आरोह घरातील वाईल्ड कार्ड एन्ट्री होता. तो बाहेरून अनेक गोष्टी बघून आला होता तरी घरातील त्याचा प्रवास सोपा राहिला नाही. याबाबत बिग बॉस बोलतात. तसेच इतरही अनेक गोष्टी मांडल्या जातात. त्यानंतर घरातील त्याच्या प्रवासाचा व्हिडीओ दाखवला जातो.

त्यानंतर वीणाचा नंबर येतो. बिग बॉसच्या घरातील वीणाचा प्रवासही अतिशय खडतर होता. बिग बॉस वीणाचा प्रवास कसा होता ते सांगतात. यामध्ये KVR ग्रुप, शिव, वीणाची आई, तिचा स्पष्टवक्तेपणा, शिवानीसोबतचे तिचे नाते, टास्कमधील तिची कामगिरी अशा अनेक गोष्टींचा उल्लेख असतो. त्यानंतर वीणाच्या प्रवासाचाही एक व्हिडीओ दाखवला जातो. हे सर्व पाहून वीणा अतिशय भारावून जाते.

(हेही वाचा: Bigg Boss Marathi 2, August 28, Episode 95 Update: शिव, किशोरी व नेहाच्या बिग बॉसच्या प्रवासातील अनेक पैलू पाहून, तुमचेही डोळे पाणावतील)

शेवटी शिवानी गार्डन एरियामध्ये येते. बिग बॉसच्या घरातील सर्वात अग्रेसिव्ह सदस्य म्हणून शिवानिकडे पाहता येईल. त्यात ती बाहेर गेल्यामुळे घरातील तिचा प्रवास अतिशय गाजला. याचसोबत वादाने तिची काही पाठ सोडली नाही. वीणा सोबत तिचे कधीही पटले नाही. माधव आणि नेहा सोबतची तिची मैत्री गाजली. अशा सर्वच बाबतील शिवानीच्या प्रवासावर बिग बॉस प्रकाश टाकतात. त्यानंतर तिच्याही प्रवासाचा एक व्हिडीओ दाखवला जातो.

शेवटी शिवानीचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी बिग बॉस केक पाठवतात. सर्वजण एकत्र तो खात आजच्या एपिसोडची सांगता होते.