Bigg Boss Marathi 2, August 18, Episode 85 Updates (Photo Credit : Colors Marathi)

एपिसोडच्या सुरवातीला फक्त बिग बॉस हे आपले घर नसून, संपूर्ण महाराष्ट्र हे आपले घर आहे. म्हणूनच बिग बॉस मराठी 2 च्या चाहत्यांना, पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन महेश मांजरेकर करतात. त्यानंतर महेश मांजरेकर हीना आणि तिच्या एकटेपणावर भाष्य करतात. घरात हीना नक्की का एकटी पडली आहे ते तिला समजावून सांगतात. त्यानंतर आजच्या आठवड्यासाठी आरोहला चावा घेतल्याबद्दल शिवला ला दोषी ठरवले जाते. त्याला शिक्षा म्हणून आरोहची माफी मागून त्याच्यासोबत डान्स करायला सांगितला जातो.

त्यानंतर चुगली बूथ सुरु होते. इथे किशोरीबद्दलची आरोहने केलेली चुगली सांगितली जाते. किशोरी या कप्तान पदासाठी लायक नाहीत असे आरोह बोलला होता. यावर किशोरी आणि आरोह आपापली मते मांडतात. त्यानंतर महेश सर्वांनाच आपला राग कंट्रोल करावा असा सल्ला देतात. त्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांचे मंचावर आगमन होते.

पहिल्यांना बुचुकले यांच्या राशीबद्दल चर्चा होते. बिचुकले यांची रास मेष असावी असे सांगत त्यांचा स्वभाव ते कथन करतात. नंतर वीणा आणि आरोह यांची रास वृषभ असावी, किशोरी यांची रास मिथुन आहे, शिवची रास वृश्चिक आहे, नेहा आणि शिवानी यांची मकर रास आहे तर हीनाची कर्क रास आहे असे सांगितले जाते.

या दरम्यान घरातील सदस्यांच्या स्वभावाबद्दल बरीच चर्चा होते. कोण, कोणाशी, कसे आणि का वागत आहे याची उत्तर उपाध्ये देतात. यासाठी अनेक मार्मिक उदाहरणेही सांगितले जातात. इथे बिचुकले यांच्या राजकीय कारकीर्द याबद्दलही चर्चा होते. मध्येच वीणाच्या एका वाक्यामुळे बिचुकले आणि वीणा यांच्याद वाद निर्माण होतो. थोडक्यात आजच्या एपिसोडमधील हा सर्वात उत्तम भाग ठरला आहे. त्यानंतर चित्रावरून गाणी ओळखण्याचा टास्क सुरु होतो. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 2, August 17, Episode 84 Updates: अभिजित बिचुकले यांनी दिली बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची धमकी; वीणा आणि शिवच्या प्रेमप्रकरणावर सर्वजण नाराज)

पहिल्या गाण्यावर वीणा आणि बिचुकले नृत्य करतात. पुढच्या गाण्यावर बिचुकले आणि आरोह नृत्य करतात. त्यानंतर शिव व हीना नृत्य करतात. यामध्ये सर्वात अप्रतिम डान्स ठरतो तो किशोरी शहाणे यांचा. आपल्या मादक अदांसह त्या बिचुकले यांच्यासोबत नृत्य करतात. पुढे नेहादेखील मुंगळा या गाण्यावर उत्तम डान्स करते. शेवटच्या गाण्यावर शिवानी आणि बिचुकले नृत्य करतात.

शेवटी हीना पांचाळ या आठवड्यासाठी बिग बॉस मराठी सीझन 2 च्या घरातून बाहेर जाते.