Bigg Boss Marathi 2, August 17, Episode 84 Updates: अभिजित बिचुकले यांनी दिली बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची धमकी; वीणा आणि शिवच्या प्रेमप्रकरणावर सर्वजण नाराज
Bigg Boss Marathi 2, August 17, Episode 84 Updates (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉसच्या मराठी आजच्या एपिसोडची सुरवात सदस्यांच्या फक्कड गाण्याने होते. रात्री सर्व सदस्य एकत्र बसून गाणी गाताना दिसतात. दुसरीकडे बिचुकले यांचे प्रत्येक गोष्टीवर कमेंट करणे काही थांबत नाही. हीनाला पोळी बनवायला येते का नाही यावरून हीना आणि बिचुकले यांच्यात शाब्दिक चकमक उडते. त्यानंतर लक्झरी बजेट येते, ज्यामुळे कोणाला काय हवे यावरून घरात भांडण सुरु होते. मुख्यत्वे बिचुकले यांच्या श्रीखंड खाण्याने, शिवानी नेहावर चिडते. त्यानंतर महेश मांजरेकर यांची घरात एन्ट्री होते.

घरातील सर्व सदस्य महेश मांजेरकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित शुभेच्छा देतात. आरोह एक सुंदर कविता सादर करतो तर बिचुकले एक गाणे परफॉर्म करतात. त्यानंतर किशोरी आणि नेहादेखील आपापल्या कविता सादर करतात. त्यानंतर पहिला वार होतो तो बिचुकले यांच्यावर. ते सतत लोकांची लायकी काढत असतात, याबाबत मांजरेकर त्यांच्यावर प्रचंड चिडतात. त्यानंतर घरातील सदस्यांना बिचुकले यांची त्यांच्यासोबत राहण्याची लायकी आहे का ? ते विचारले जाते. यावर सदस्य नाही असे म्हणत आपापली मते मांडतात. यावर बिचुकले, मी असाच आहे असे उत्तर देतात. यावर महेश मांजरेकर यांचा पारा चढतो.

त्यानंतर वीणा आणि बिचुकले यांच्या भांडणाबद्दल नक्की काय घडले ते महेश विचारतात. वीणा तिची मते मांडत असताना बिचुकले चिडून बिग बॉस सोडण्याची धमकी देतात. यावर मांजरेकर त्यांना इथून बाहेर पडण्यासाठी तुमची मर्जी चालणार नाही असे सांगतात. पुढे टास्कमध्ये शिव ज्या प्रकारे आरोहला चावला होता त्याबद्दल त्याला समज दिली जाते. त्यानंतर वीणा आणि शिवानी एकमेकींशी ‘शिव्या देणे’ यावर भिडतात. त्यानंतर वीणा आणि आरोह यांच्यामध्ये कपड्यांवर घडलेल्या भांडणाबद्दल स्पष्टीकरण मागितले जाते. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 2, August 16, Episode 83 Update: बिग बॉस च्या घरात ब्रेकिंग न्यूज बनवण्यासाठी सदस्यांची चढाओढ; हीना चक्क बिकनीमध्ये आली दिसून)

अखेर या आठवड्यातील सर्वात चर्चित मुद्दा शिव आणि वीणा प्रेमप्रकरणाचा समाचार केने सुरु होते. शिव ज्याप्रकारे वीणाशी प्रत्येकवेळी झोंबत आहे त्याबद्दल महेश मांजरेकर त्याला खूप ओरडतात. त्यावर वीणा हे सर्व कसे सहन करते? ती शिवला का समजावून सांगत नाही? असा प्रश्न तिला विचारला जातो. शेवटी कप्तानपदाच्या टास्कमध्ये शेवटी कोण जाणार याबाबत जे भांडण घडले होते त्याबद्दल सदस्य नक्की कुठे चुकले याबाबत महेश समजावून सांगतात.