Bigg Boss Marathi 2, August 16, Episode 83 Update: बिग बॉस च्या घरात ब्रेकिंग न्यूज बनवण्यासाठी सदस्यांची चढाओढ; हीना चक्क बिकनीमध्ये आली दिसून
Bigg Boss Marathi 2, August 16, Episode 83 (Photo Credit : Colors Marathi)

एपिसोडची सुरुवात वीणा आणि शिवानी यांच्या एका छोट्याच्या बैठकीने होते. इथे दोघी आता व्यवस्थित राहण्याचा निर्णय घेतात. बिग बॉसच्या घरात दिवसाची सुरुवात झाल्यावर सदस्यांना Ponds ची काही उत्पादने दिली जातात. त्यानंतर घरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. आरोहला किशोरी, नेहा, वीणा, शिवानी राखी बांधतात. त्यानंतर शिवला किशोरी, नेहा, शिवानी राखी बांधतात. बिचुकले यांना किशोरी व शिवानी राखी बांधतात. त्यानंतर बिचुकले हीनाकडे वीणाची तक्रार करतात.

त्यानंतर बिग बॉस कडून सदस्यांना ब्रेकिंग न्यूज हा टास्क दिला जातो. यामध्ये सदस्यांना ब्रेकिंग न्यूज तयार करून वार्ताहर व वृत्तनिवेदकाचे लक्ष आपल्याकडे वेधायचे आहे. पहिल्यांना शिवानी विषबाधा येऊन चक्कर येऊन पडण्याचे नाटक करते, ज्याची बातमी बिचुकले सांगतात. मात्र यादरम्यान सदैव कन्फुज असलेले सदस्य हा टास्क नक्की कसा खेळायचा यावरून भांडू लागतात. यावर पुन्हा बिग बॉस सदस्यांना एकत्र बोलावून नियम समजावून सांगतात.

त्यानंतर वीणा दारू पिऊन धिंगाणा करण्याचे नाटक करते. सदस्य ज्या प्रकारे खेळ खेळत आहेत हे पाहून मागच्या सीझनची आठवण आल्याशिवाय रहात नाही. मागच्या सीझनमध्ये हाच टास्क सदस्यांनी अतिशय योग्य प्रकारे खेळला होता मात्र आज या ठिकाणी अक्षरशः सदस्यांचा बाळबोधपणा चालू होता. पुढे आरोह आणि हीना फ्रीझमध्ये बिचुकले यांची चड्डी सापडल्याचे सांगतात.

त्यानंतर नेहा आणि आरोह बिग बॉसच्या घरात भूत असल्याची ब्रेकिंग न्यूज बनवतात. या सर्वांपैकी शिवानीला विषबाधा झाली, नेहाच्या अंगात भूत येणे व वीणा हिचे दारू पिणे या तीन ब्रेकिंग बातम्या सादर केल्या जातात.

त्यानंतर पुरुषांच्या बेडरूममध्ये लिंबू, हळद, कुंकू आढळते. तर दुसरीकडे हीना बिकनीमध्ये फिरण्याचेही नाटक करते. त्यानंतर ब्रेकिंग न्यूज म्हणून आरोह आणि शिवानी एकमेकांशी लग्न करण्याचे नाटक सुरु करतात. यापैकी शिवानी आणि आरोहचे लग्न व हीनाचे बिकनीमध्ये फिरणे या न्यूज सादर केल्या जातात. (हेही वाचा: बिग बॉसच्या घरात मेघा आणि रेशम यांच्यामध्ये रंगला पाकस्पर्धेचा टास्क; सुशांत आणि त्याची टीम ठरले साप्ताहिक कार्यात विजयी)

पुढच्या वेळी वीणा बिचुकले यांचा माईक लपवून ठेऊन न्यूज तयार करण्याचा प्रयत्न करते. मात्र लगेच शिवानी आणि आरोह यांचे भांडण सुरु होते, ज्यामध्ये शिवानी आरोहला मारू लागते त्याची न्यूज बनवण्यासाठी बिचुकले व्यस्त होतात. पुढे रक्षाबंधन निमित्त भाऊ बहिणींना राखी बांधण्याची ब्रेकिंग न्यूज तयार केली जाते. त्यानंतर किशोरी यावयातही व्यायाम करण्याची ब्रेकिंग न्यूज तयार केली जाते. पुढे शिव बिग बॉसच्या घरात सोन्याच्या खजाना मिळण्याची न्यूज तयार करतो. त्यानंतर किशोरी आरोहला कायमचे अडगळीच्या खोलीत टाकण्याची न्यूज तयार केली जाते. या सर्वांमधून किशोरी आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचून दाखवतात. किशोरी यांच्या निर्णयामुळे नेहा आणि आरोह नाखूष असल्याचे जाणवते. इथे हीना घरातील सदस्यांची तक्रार न्यूजच्या रूपाने करते. शेवटी किशोरी तिला हव्या त्या न्यूज सादर करतात. मात्र घरातील सर्व सदस्य किशोरी आणि बिचुकले यांच्या निर्णयामुळे पूर्णतः निराश झालेले दिसतात.