Bigg Boss Marathi 2, August 15, Episode 82 Update: बिग बॉसच्या घरात मेघा आणि रेशम यांच्यामध्ये रंगला पाकस्पर्धेचा टास्क; सुशांत आणि त्याची टीम ठरले साप्ताहिक कार्यात विजयी
Bigg Boss Marathi 2, August 15, Episode 82 (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉसच्या घरात आजच्या दिवसाची सुरुवातही एका भन्नाट गाण्याने होते. मात्र काल चालू असलेला टास्क आजही पुढे चालणार असल्याने सर्व सदस्य आपल्या झेंड्यांचे रक्षण करण्यासाठी त्या त्या जागा सांभाळण्याचा प्रयत्न करतात. यात काही झेंड्यांची स्टिकर्स काढली जातात यामुळे घरात वाद सुरु होतो. आता या टास्क प्रमाणे आपल्याला हवा असलेला भाग वापरण्यासाठी त्या त्या भागातील राजा किंवा राणी यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. याचमुळे प्रत्येक टीम एकमेकांना समस्या निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

या दरम्यान रेशमच्या टीममधील नेहा आणि शिव लांब आहेत हे पाहून सुशांतच्या टीममधील हीना रेशमच्या जागेवर आपला झेंडा लावते. हीनाच्या या कृत्याची सर्वजण तारीफ करतात. दुसरीकडे शिवानी आणि आरोह मुद्दाम सुशांतला जास्त खाऊ पिऊ घालतात, जेणेकरून त्याला बाथरूमला जावे लागेल जो भाग मेघाच्या ताब्यात आहे. त्यानंतर पुढच्या जागेसाठी लढत सुरु होते. यामध्ये टीममधील सदस्यांना विविध शारीरिक छोटे छोटे टास्क दिले जातात. शिव हे टास्क जिंकत रेशमला विजेतेपद मिळवून देतो. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 2, August 14, Episode 81 Update: पुन्हा एकदा रेशम आणि मेघा यांच्यामध्ये रंगला टास्क; साप्ताहिक कार्यातून आरोह झाला बाहेर)

पुढील कार्य किचनमध्ये राज्य प्रस्थापित करण्यासाठी असणार असल्याचे बिग बॉस सांगतात. यासाठी आता मेघा आणि रेशम लढणार आहेत. या टास्कमध्ये दोन्ही टीमला 45 मिनिटात पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जातो. बझर वाजल्यावर दोन्ही टीम आपापले पदार्थ बनवायला सुरुवात करतात. सर्वात आधी मेघा, शिवानी आणि आरोह नुडल्स बनवतात. तर रेशम, शिव आणि शिवानी कटलेट्स व शिरा बनवतात. यामध्ये मेघा आणि तिची टीम हा टास्क जिंकतात व त्यांना किचन टीमचा ताबा मिळतो.

सर्व टास्क झाल्यावर सुशांतकडे 3 राज्ये, मेघाकडे 2 राज्ये आणि रेशमकडे 1 राज्ये राहते. अशाप्रकारे या साप्ताहिक कार्यामध्ये सुशांतची टीम विजेती ठरते. त्यानंतर सर्व सदस्यांसोबत संगीतावर उशी पास करण्याचा टास्क सुरु होते. यामध्ये हरलेले सदस्य विविध कला सादर करतात.