Bigg Boss Marathi 2, 23 July, Episode 59 Highlights: बिग बॉस 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरात आज स्पर्धकांमध्ये 'एकला चलो रे' हे नॉमिनेशन कार्य रंगले. घराची कॅप्टन असल्याने शिवानी यापासून सुरक्षित होती. मात्र इतर सदस्यांना हा टाक्स पूर्ण करण्याचा होता. (शिवानी सुर्वे आता 'बिग बॉस' च्या घरात पाहुणी नव्हे तर पुन्हा सदस्य बनली; अभिजित केळकर ला कडवी टक्कर देत बनली घराची कॅप्टन!)
या टास्क मध्ये रंगीत पाण्याचा बोल हातात घेऊन एका ठराविक रिंगमधून चालायचे होते. पाणी सांडू न देता आणि संचालिकेच्या सूचनांचे पालन करत हा टास्क पूर्ण करायचा होता. तसंच इतर स्पर्धकांच्या बोलमधील पाणी पाडण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरण्याची मूभा होती. मात्र नियमांचे उल्लंघन न करता.
कार्यामध्ये नेहा आणि संचालिका शिवानी यांच्यात खेळातील नियमावरुन थोडा वाद झाला. मात्र बिग बॉसने संचालिका आणि स्पर्धकांमधील टास्कच्या नियमांवरुन असलेला गोंधळ दूर केला. आरोह वेलणकर याच्या दिलखुलास कॉमेंट्रीने नॉमिनेशन कार्य अधिक रंजक केले. (बिग बॉसच्या घरात आज रंगणार Nomination Task; कप्तानपदाची हवा शिवानीच्या डोक्यात, बनवले स्वतःचे नियम)
या नॉमिनेशन कार्यात 5 रॉऊंड्स होते. त्यापैकी पहिल्या राऊंडमध्ये हिना नॉमिनेट झाली. तर दुसऱ्या राऊंडमध्ये वीणा आणि तिसऱ्या राऊंडमध्ये किशोरीताई नॉमिनेट झाल्या. चौथ्या राऊंडमध्ये माधवची विकेट गेली. पाचव्या आणि शेवटच्या राऊंडमध्ये नेहा नॉमिनेट झाली.
दरम्यान विणा आणि हिना यांनी कुजबूज करुन बिग बॉसच्या घरातील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संचालिकेने त्यांना अडगळीच्या खोलीत डांबले.
विशेष म्हणजे शिवानीच्या कालच्या वागण्यामुळे हिना दुखावली गेली होती. त्यामुळे आज शिवानीने हिनाची चक्क माफी मागितली. तर हिना-शिवानीची गॅसवरुन बाचाबाची देखील झाली. अभिजीत-हिनाची गट्टी मात्र दिसून आली. अभिजीतने हिनाच्या खेळीचे कौतुक करत तिला तिच्या चुका दाखवून दिल्या.