Bigg Boss Marathi 2, Episode 59 Preview: बिग बॉसच्या घरात आज रंगणार Nomination Task; कप्तानपदाची हवा शिवानीच्या डोक्यात, बनवले स्वतःचे नियम
Bigg Boss Marathi 2, Episode 59 Preview (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉस मराठी सीझन 2 (Bigg Boss Marathi 2) च्या कालच्या एपिसोडमध्ये घरात कप्तानपदाचा टास्क रंगला. या टास्कमध्येही सदस्य अगदी जीव तोडून खेळले, शेवटी शिवानी नवीन कप्तान म्हणून निवडली गेली. मात्र सुंभ जळेल पण पीळ जळत नाही या उक्तीप्रमाणे शिवानीचा मूळ स्वभाव जाणार नाही. कप्तान झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी तिचे हीनासोबत क्षुल्लक कारणावरून भांडण होणार आहे. बिचारी हीना तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते मात्र कप्तानपदाची हवा गेलेली शिवानी सध्या आकाशात उडत आहे.

नॉमिनेशन टास्क दरम्यान वीणा आणि हीना बिग बॉस च्या घरातील एक महत्वाचा नियम तोडतात. घरात कुजबुज करण्यास मनाई असूनही या दोघी कुजबुज करताना आढळल्याने घराची नवीन कप्तान शिवानी या दोघींनाही अडगळीच्या खोलीत राहण्याची शिक्षा देते. इथे ती दोघींनी एकमेकींशी बोलू नये असे सांगते, त्याचा जाब विचारल्यावर ‘माझे स्वतःचे काही नियम आहेत’ असे उत्तर दिले जाते. (जाणून घ्या काय होईल आजच्या एपिसोडमध्ये)

सोबतच बिग बॉसच्या घरात आज ‘एकला चलो रे’ हा नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. यामध्ये गोल चक्रावर सर्वांना हातात रंगाचे पाणी घेऊन चालत राहायचे आहे. शिवानी, सुरु होण्याचा आणि थांबण्याचा संकेत देईल. आता हा खेळ नक्की काय आहे, कोण होणार Safe आणि कोण होणार Nominate हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड पाहावा लागेल.