Bigg Boss Marathi 2, 22 July, Episode 58 Updates: शिवानी सुर्वे आता 'बिग बॉस' च्या घरात पाहुणी नव्हे तर पुन्हा सदस्य बनली; अभिजित केळकर ला कडवी टक्कर देत बनली घराची कॅप्टन!
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2, 22 July, Episode 58 Highlights: बिग बॉस 2 (Bigg Boss Marathi 2) ची स्पर्धक शिवानी सुर्वे ही यापूर्वी काही कारणास्तव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. मात्र पुन्हा एकदा ती स्पर्धेत सहभागी झाली. पाहुणी म्हणून आलेल्या शिवानीला आठवड्याभरानंतर मागच्या घरातील सकारात्मक वावर, कार्यातील उत्साहपूर्वक सहभाग, कामगिरी आणि तिचे  शारीरिक-मानसिक स्वास्थ्य लक्षात घेऊन आज तिला बिग बॉसकडून घरातील सदस्यत्वाचा दर्जा देण्यात आला आहे.

मागील आठवड्यातील मर्डर मिस्ट्री या साप्ताहिक कार्यातील सर्वोत्तम कामगिरी केल्याने अभिजीत केळकर हा या आठवड्यातील कॅप्टनसी पदासाठी पहिला उमेदवार ठरला. तर खुनी म्हणून चोख कामगिरी बचावल्याने शिवानी सुर्वे कॅप्टनसीच्या शर्यतीत दुसरी उमेदवार ठरली. (Bigg Boss Marathi 2, Episode 58 Preview: बिग बॉस च्या घरातील हल्लाबोल टास्कमध्ये अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे मध्ये होणार जोरदार घमासान, Watch Video)

या दोघांपैकी एकाची कॅप्टन म्हणून निवड करण्यासाठी बिग बॉसने घरातील सदस्यांवर हल्लाबोल हे कॅप्टनसी कार्य सोपावलं. यात एका टीमने दुसऱ्या टीमच्या राज्यकर्त्याच्या सर्व प्रतिमा नष्ट करायच्या होत्या. त्यासाठी काही अटी, नियम नेहमीप्रमाणे होतेच. या दोन टीममध्ये हे कॅप्टनसी कार्य रंगले.

अभिजीत केळकर टीम: वीणा, हिना, रुपाली, आरोह.

शिवानी सुर्वे टीम: शिव, नेहा, माधव, किशोरी.

टाक्सला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही टीम्स चढावर ओढ करत, एकमेकांवर कुरघोडी करत जिंकण्याचा प्रयत्न करत होते. यात भांडणं, शाब्दिक बाचाबाची सुरु होतीच. काहींना तर इजा देखील झाली. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरोह disqualify झाला. अखेर अभिजीतच्या टीमच्या सर्व प्रतिमा नष्ट करण्यात शिवानीच्या टीमला यश आले आणि त्यामुळे शिवानी या आठवड्याची कॅप्टन ठरली.

मात्र या सर्व खेळात हिना, शिवानीने वापरलेल्या शब्दांमुळे दुखावली गेली आणि रडू लागली. सर्वांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच शिवानीने देखील तिची विचारपूस केली. मात्र तिला हिनाने नीटसे उत्तर दिले नाही.