Bigg Boss Marathi 2, Episode 58 Preview: बिग बॉस च्या घरातील हल्लाबोल टास्कमध्ये अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे मध्ये होणार जोरदार घमासान, Watch Video
Bigg Boss Marathi 2 Preview 58 (Photo Credits: Voot)

बिग बॉस 2 (Bigg Boss Marathi 2) च्या विकेंडचा डाव मध्ये रविवारी गायिका वैशाली माडे (Vaishali Made) हिची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली. त्यानंतर सलग 2 दिवस विकेंडच्या डावमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) सर्व स्पर्धकांची जी शाळा घेतली त्याच्यावर आज प्रत्येकामध्ये चर्चा रंगणार आहे. वैशाली माडे हिची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाल्यानंतर आता स्पर्धकांची विशेष करुन वैशालीचा सर्वात जवळचा झालेला अभिजी केळकर ची पुढे काय रणनीती असेल याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आजच्या भागात महेश मांजरेकरांनी वीणा जगताप (Veena Jagtap) आणि शिव ठाकरे (Shiv Thakre) यांना जो सल्ला दिला त्यावर आता यापुढे हे दोघांचे नातं कसं असेल हे पाहायचय. त्यासंदर्भात हे दोघे आज आत्मचिंतन करताना दिसतील. तर दुसरीकडे वीणा च्या कॅप्टन्सी पदाच्या टास्कसाठी शिव ने आपल्या हातावर तिच्या नावाचा जो पर्मनंट टॅटू काढला आहे, त्यावर शिवानी सुर्वे बरेच टोमणे मारताना या प्रीव्ह्यू मध्ये दिसत आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज बिग बॉसच्या घरात हल्लाबोल टास्क रंगणार आहे. पाहा व्हिडिओ

हेही वाचा- Bigg Boss Marathi 2, 21 July, Episode 57 Updates: 'बिग बॉस'च्या घरातून वैशाली माडे आऊट; भांडण, डान्स सह महेश मांजरेकर यांच्या शाळेत रंगला वीकेंडचा डाव

या टास्कमध्ये शिव आणि अभिजीत मध्येही बाचाबाची झालेली दिसत आहे. थोडक्यात आजचा भाग हा खूप इंटरेस्टिंग असून हल्लाबोल टास्क पाहून आज कायतरी नवीन राडा पाहायला मिळेल हे मात्र नक्की.

गायिका वैशाली माडे आणि अभिजीत केळकर याची बिग बॉसच्या घरातील सर्वात जवळची व्यक्ती घराबाहेर पडल्यामुळे आता या घराचे चित्र कसे असेल तर दुसरीकडे आरोह वेलणकर याची वाइल्ड कार्ड एन्ट्री किती वाइल्ड ठरेल हे लवकरच ठरेल.