Bigg Boss Marathi 2 Day 16 Episode: बिग बॉस मराठी 2च्या घरात आज पुन्हा नव्या आठवड्याच्या टास्कला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यातील घरातील सदस्यांच्या बेशिस्त वागणुकीमुळे यंदा इम्युनिटी टास्क आणि घरात कोणीच कॅप्टन नाही. त्यामुळे घरातील सदस्यांच्या चुकांचा हिशेब ठेवण्यासाठी आता बिग बॉसने बाप्पा म्हणजे विद्याधर जोशी यांच्यावर एक सिक्रेट टास्क सोपवलं आहे. त्यानुसार बाप्पाला घरातल्या लोकांच्या चूका सांगायच्या आहेत. 15 व्या दिवसाचा शेवट माफीनाम्याने झाला. किशोरी शहाणे वीज यांनी शिवानी सुर्वे यांची माफी मागितली. Bigg Boss Marathi 2, 3rd Week Nomination: पराग कान्हेरे, किशोरी शहाणे, नेहा शितोळे, दिगंबर नाईक, माधव देवचक्के आणि अभिजीत बिचुकले झाले नॉमिनेट
16 व्या दिवशी घरातील सदस्यांमध्ये पुन्हा शिव ठाकरे कॅप्टन म्हणून कसा अपयशी ठरला यावरून पुन्हा घरातील सदस्यांमध्ये चर्चा रंगली. त्यानंतर सदस्यांना शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य सोपवलं आहे. घरातील सदस्य दोन टीम मध्ये विभागले आहेत. त्यामध्ये शिव, वैशाली, पराग, सुरेखा, रुपाली, वीणा हे शिक्षक आहेत तर . किशोरी शहाणे मुख्याध्यापिका आहेत. शिक्षकांना एका सदस्यांना नापास करून 'कॅप्टन' होण्यापासून दूर करायचं आहे.
शाळेच्या पहिल्या तासातच अभिजित बिचुकले यांनी गाणं शिवानीसाठी गाणं गायलं. त्यावर शिवानी आणि नेहाने डान्स केला. शाळेच्या पहिल्या तासातच अभिजित बिचुकले यांनी गाणं शिवानीसाठी गाणं गायलं. त्यावर शिवानी आणि नेहाने डान्स केला. शाळेमध्ये पहिला विषय मराठी चा होता. शिव या तासाचा शिक्षक होता. त्यादरम्यान शिव आणि नेहामध्ये वाद झाला. 'घरातील संस्कार' काढल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला.पुढे गृहविज्ञान विषय शिकवण्यासाठी रुपाली वर्गात आली. तिने अभिजित बिचुकलेची 'हायजिन' वरून शाळा घेतली.
आत्तापर्यंत नेहा शितोळे आणि अभिजित बिचुकले कॅप्टनसीच्या रेस मधून बाहेर पडले आहेत.