Bigg Boss Marathi 2, 3rd Week Nomination: पराग कान्हेरे, किशोरी शहाणे, नेहा शितोळे, दिगंबर नाईक, माधव देवचक्के आणि अभिजीत बिचुकले झाले नॉमिनेट
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

BBM2 Day 16 Written Update: बिग बॉस मराठी 2 घरात आज तिसऱ्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली आहे. वारंवार घरातील सदस्यांना समज देऊनही नियमांचं उल्लंघन होत असल्याने या आठवड्यात कोणताही कॅप्टन नाही. त्यामुळे सारेच सदस्य नॉमिनेशनसाठी पात्र ठरले. बिग बॉसच्या घरात यंदा बिग बॉस मिठाई या खेळाच्या माध्यमातून नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. त्यानुसार बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी अपात्र सदस्यांना मिठाईच्या स्वरूपात तळून नॉमिनेट केलं. यानुसार पराग कान्हेरे, किशोरी शहाणे, नेहा शितोळे आणि दिगंबर नाईक नॉमिनेट झाला. तर वारंवार नियम मोडल्याने इम्युनिटी न मिळाल्याची शिक्षा ज्या सदस्यांमुळे मिळाली त्या दोन सदस्यांची नाव घरातील साऱ्यांनी एकत्र निवडली. यामध्ये माधव देवचक्के आणि अभिजीत बिचुकले या दोन सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. यंदाची नॉमिनेशन प्रक्रिया ही उघड स्वरूपात पार पडली.

घरच्यांच्या आठवणींनी हळहळले सदस्य

रात्री घराच्या अंगणात बसलेलं असताना वैशाली माडे सोबत गाण्याच्या मैफिलींमध्ये 'लग जा गले' या गाण्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नेहा आणि शिवानी आपल्या वडिलांच्या आठवणींनी हळहळल्या. तर दुसरीकडे अभिजित केळकर हा त्याच्या मुलांच्या आठवणींनी थोडा भावूक झाला होता. खेळादरम्यान त्याने त्याच्या मुलांसोबतचा फोटो नष्ट केला होता. आता नवा फोटो मिळावा अशी विनवणी त्याने बिग बॉस कडे केली आहे.