Bigg Boss 15: आजपासून 'बिग बॉस'च्या नव्या सीजनला सुरुवात; प्रीमियर पूर्वी पहा घराची झलक (Watch Video)
Bigg Boss (Photo Credits: Twitter)

सलमान खान (Salman Khan) चा लोकप्रिय शो बिग बॉस (Bigg Boss) चा नवा सीजन (New Season) आजपासून (शनिवार, 2 ऑक्टोबर) सुरु होणार आहे. यंदा शो मध्ये अनेक मोठी नावे सहभागी होणार आहेत. अफसाना खान, अकास सिंह, डोनल बिष्ट, ईशान सहगल, करण कुंद्रा, निशांत भट्ट, मीशा अय्यर, साहिल श्रॉफ, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, सिंबा नागपाल, तेजस्वी प्रकाश, उमर रियाज, विधि पंड्या, विशाल कोटियन आणि जय भानुशाली बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. अशातच बिग बॉस 15 च्या घराची झलक समोर आली आहे. प्रीमियरपूर्वी प्रेक्षकांना बिग बॉसच्या घराचा नजारा पाहायला मिळणार आहे.

यंदा जंगल थीमवर आधारीत घराचं इंटिरियर आहे. यासोबत सर्व सुख सोयींनी सज्ज असं हे घर आहे. हे घर डिझाईन करण्याची संपूर्ण जबाबदारी ओमंग कुमार यांनी सांभाळली आहे. फिल्म सिटीमधील सेटला त्यांनी जबरदस्त लूक दिला आहे. (Bigg Boss 15 साठी Salman Khan चे मानधन ऐकून व्हाल थक्क; 14 आठवड्यांसाठी आकारले तब्बल 'इतके' कोटी)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बिस बॉस ओटीटीची सांगता झाल्यानंतर आता टीव्हीवर बिग बॉस 15 सुरु होणार आहे. बिग बॉस शो चा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे टीव्हीवरील सीजन पाहण्यासाठी प्रेक्षक अत्यंत उत्सुक आहे. दरम्यान, यंदा देखील नेहमीप्रमाणे सलमान खान हा शो होस्ट करणार आहे.