बिग बॉस 14 (Image Credit: Instagram)

Bigg Boss 14:  बिग बॉसच्या सीझन 14 ला नुकतीच सुरुवात झाली आहे. नेहमी प्रमाणेच यंदा ही अभिनेता सलमान खान याचे होस्टिंग करताना दिसून येणार आहे. काल बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणारे सदस्य कोण असणार हे दिसून आले आहे. तसेच राधे मां ही सुद्धा घरातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी तेथे पोहचली होती. बिग बॉसच्या घरात 11 कंन्टेस्टंट्सह यापूर्वीचे 3 जण सुद्धा म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान सुद्धा दिसून येणार आहे. ही लोक फक्त 2 आठवडे घरात राहणार आहेत. त्याचोसबत घरातील सदस्यांवर आपला हुकूम गाजवताना तुम्हाला दिसणार आहे. याच दरम्यान आता बिग बॉसचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये स्वघोषित धर्मगुरु राधे मां दिसून येत आहे.(Bigg Boss 14 च्या घरात पहिल्या दिवशी झाली जबरदस्त कॅटफाईट, भांड्यांच्या कामाला घेऊन जैस्मिन आणि निक्कीमध्ये झाली तूतू-मैंमैं)

बिग बॉसच्या नव्या प्रोमोमधील व्हिडिओत घरातील लोकांना आशीर्वाद देत आहे. तसेच घरातील सदस्य सुद्धा टाळ्या वाजवताना दिसून येत आहेत. त्यानंतर राधे मां हिच्या नावाचा गजर केला जातो. या वेळी सिद्धार्थ शुक्ला राधा मां हिच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी जातो. तसेच अन्यजण राधे मां हिचे नाव घेतानाच दिसून येत आहेत.(Bigg Boss 14 Salman Khan First Look: सलमान खान याने बिग बॉस 14 च्या सेटवरुन पोस्ट केला शानदार फोटो, इंटरनेटवर लावली आग)

यापूर्वी असे बोलले जात होते की, राधे मां कंटेस्टंट म्हणून घरात एन्ट्री करणार आहे. मात्र आता स्पष्ट झाले आहे की, ती आता कंस्टेंट म्हणून नसणार आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणारे सदस्यांमध्ये एजाज खान, निक्की तंबोली, रुबीना दिलैक, अभिनव शुक्ला, जॅस्मिन भसीन, निशांत सिंह मकानी, शहजाद देओल, सारा गुरपाल, जान गुरपाल, जान कुमार सानू, पवित्रा पुनिया आणि राहुल वैद्य यांचा समावेश आहे.