हिंदीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस चा 14 (Bigg Boss 14) वा सीजन सुरु झाला आहे. अभिनेता सलमान खानने दणक्यात या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात एजाज खान (Ezaz Khan), निक्की तंबोली (Nikki Taboli), रुबीना दिलैक, अभिनव शुक्ला, जैस्मिन भसीन (Jasmin Bhasin), निशांत सिंह मलकानी, शहजाद देओल, सारा गुरपाल, जान कुमार सानू, पवित्रा पुनिया आणि राहुल वैद्य यंदाचे बिग बॉसचे स्पर्धक असून या सर्वांची दणक्यात एन्ट्री झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी या घरामध्ये महिला स्पर्धकांमध्ये जबरदस्त तूतू-मैंमैं झालेली पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात निक्की तंबोली आणि जैस्मिन भसीन यांच्यामध्ये भांड्यावररून भांडणं झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
खरे पाहता घरात आल्यावर निक्की तंबोली आणि एजाज खानमध्ये छोटे छोटे खटके उडालेले पाहायला मिळाले. मात्र आज निक्की आणि जैस्मिन मध्ये जोरदार भांडणं पाहायला मिळणार आहे. या भांडणाचे कारण आहे घरातील कामांची विभागणी. यातील भांडी घासण्याच्या कामावरून या दोघींमध्ये भांडणं झालेली पाहायला मिळणार आहे. Salman Khan Private Room Video: Bigg Boss 14 च्या घरात अशी असेल सलमान खान ची प्रायव्हेट रुम; पहा व्हिडिओ
या भांडणामध्ये निक्की भांडी घासण्यास नकार देते कारण तिचे असे म्हणणे होते की भांडी घासल्याने तिची नखं खराब होतील. त्यात जैस्मिन निक्कीला सुरुवातीला थोडे सहकार्य करण्यास सांगते. मात्र ती काही ऐकत नाही. त्यानंतर एजाजही निक्कीला समजावताना दिसत आहे. मात्र निक्की काही झाले तरी हे काम करण्यास तयार होत नाही. या भांडणानंतर दोघीही रडायला लागतात. असेही यात दाखवण्यात आले आहे.
त्यामुळे एकूणच या एपिसोडमध्ये नक्की काय होते हे पाहण्यासाठी बिग बॉस चा 14 वा सीजन पाहायला हवाच.