Bigg Boss 14 Salman Khan First Look: सलमान खान याने बिग बॉस 14 च्या सेटवरुन पोस्ट केला शानदार फोटो, इंटरनेटवर लावली आग
सलमान खान (Photo Credits-Instagram)

Bigg Boss 14 Salman Khan First Look: बॉलिवूड मधील भाईजान सलमान खान याचा हिट शो बिग बॉस 14 साठी शूटिंग सुरु केली आहे. या शो बद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली होतीच. पण कधी हा शो सुरु होणार त्याची सुद्धा आवर्जुन वाट पाहत आहेत. येत्या 3 ऑक्टोंबरला येणाऱ्या बिग बॉसच्या सीझन 14 चा ग्रँड प्रीमियर असणार आहे. मेकर्सकडून या शो साठी आता शूटिंग सुरु करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर सलमान याने बिग बॉसच्या सेटवरुन एक शानदार फोटो शेअर केला आहे. कोरोनाच्या संकट काळात शूटिंग मध्ये आता व्यस्त होणाऱ्या सलमानने काळ्य रंगाचा मास्क आणि कपडे परिधान करत आपल्या स्टायलिश अंदाजात दिसून येत आहे.(Bigg Boss 14: सलमान खानचा शो बिग बॉस 14 मध्ये होणार 'Radhe Maa' ची एन्ट्री; समोर आला नवा प्रोमो Watch Video)

सलमान याने आपला हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असे लिहिले आहे की, बिग बॉस 14 येत्या विकेंडला येत आहे. सलमान याने हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियात आग लावली असून त्याला काही मिनिटांमधअये लाखोंच्या संख्येने लाइक्स मिळाले आहेत. सोशल मीडियात त्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल ही होत असून त्याबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आहे.(Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान, हिना खानसह प्रिंस नरूला ची सुद्धा होऊ शकते बिग बॉस च्या घरात रिएन्ट्री)

 

View this post on Instagram

 

#BiggBoss14 coming to you this weekend...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

दरम्यान, शो बद्दल अशी चर्चा सुरु झाली होती की बिग बॉसच्या सीझन 14 साठी सिद्धार्थ शुक्ला, जॅस्मिन भसीनसह हिना खान हिने सुद्धा शूटिंग सुरु केले आहे. त्यानंतर आता सलमान खान याचा फोटो सोशल मीडियात खबळबळ उडवत आहे. तर सिद्धार्थ शुक्ला, हिना खान, गौहर खान हे गेस्ट कंटेस्टेंट म्हणून 20 दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात झळकणार आहेत. या व्यतिरिक्त राधे मा, जॅस्मिन भसीन, निशांत सिंह मलकानीसह अन्य काही जण सुद्धा दिसून येणार आहेत.