Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान, हिना खानसह प्रिंस नरूला ची सुद्धा होऊ शकते बिग बॉस च्या घरात रिएन्ट्री
बिग बॉस सीजन 9 च्या विजेतेपदावर आपले नाव कोरलेला प्रिंस सीजन 14 मध्ये पाहुणा स्पर्धक म्हणून येणार असल्याचे सांगितले आहे. यंदा कोरोनाचा या सीजनवर परिणाम होऊ नये म्हणून या कार्यक्रमाचे निर्माते अनेक प्रयत्न करत आहेत. हा सीजन मनोरंजक बनविण्यासाठी निर्मात्यांनी हा नवीन प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) थोडा उशीरच झालेला हिंदीतील वादग्रस्त तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यंदाही सलमान खान (Salman Khan) करणार आहे. लवकरच बिग बॉस 14 (Bigg Boss 14) सर्वांच्या भेटीला येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे या शोचे नवीन नियम काय असतील हे घर कसे असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शो मध्ये कोणकोण स्पर्धक असतील. सर्वांनाच याची उत्सुकता लागली असून आधीच्या बिग बॉस सीजनमधील विजेता सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान या 14 व्या सीजनमध्ये दिसणार आहे. यांच्यासोबत आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे प्रिंस नरूला (Prince Narula).
बिग बॉस सीजन 9 च्या विजेतेपदावर आपले नाव कोरलेला प्रिंस सीजन 14 मध्ये पाहुणा स्पर्धक म्हणून येणार असल्याचे सांगितले आहे. यंदा कोरोनाचा या सीजनवर परिणाम होऊ नये म्हणून या कार्यक्रमाचे निर्माते अनेक प्रयत्न करत आहेत. हा सीजन मनोरंजक बनविण्यासाठी निर्मात्यांनी हा नवीन प्रयोग करण्याचे ठरवले आहे. Bigg Boss 14: लक्झरी सुविधांपासून ते क्रूसाठी साप्ताहिक कोरोना व्हायरस चाचणी पर्यंत, जाणून घ्या Salman Khan चा शो बिग बॉस 14 मध्ये काय असू शकते खास
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिंस नरूला या शो मध्ये 2 आठवड्यांसाठी राहिल. यात सिद्धार्थ शुक्ला, हिना खान, गौहर खान देखील 2 आठवड्यांसाठी राहणार असून हे चौघे या शोमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. घरात मॉल, स्पा आणि थिएटर यांची सेवा कशी मिळेल? याचा निर्णय हे लोक घेतील.
याआधी सिद्धार्थ शुक्ला, हिना खान, गौहर खान यांचा प्रोमो समोर आला आहे. जो लोकांनी देखील प्रचंड पसंत केला आहे. मात्र अजून प्रिंस ला घेऊन कोणतीही अपडेट्स मिळत नाही आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2020 02:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

