मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: जलसाठा पुन्हा 90% च्या पार; पहा आजची स्थिती
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. मात्र, पावसाची पुढील वाटचाल आणि साठ्यातील बदल यावर बीएमसीचे बारीक लक्ष राहणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा सध्या समाधानकारक पातळीवर असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) हायड्रॉलिक इंजिनिअरिंग विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार, या तलावांमधील एकूण उपयुक्त जलसाठा १३ लाख ६ हजार ३६४ दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला असून, हे प्रमाण एकूण क्षमतेच्या ९०.२६ टक्के इतके आहे.
सध्या मोडक सागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून येथे १०० टक्के साठा नोंदवण्यात आला आहे. विहार तलावातही १०० टक्के साठा असल्याचे अहवालात नमूद आहे, तानसा तलावात ९९.१८ टक्के, तर तुळशी तलावात १०० टक्के उपयुक्त साठा आहे. मध्य वैतरणा तलावात ९३.७२ टक्के साठा नोंदवला गेला. तर अप्पर वैतरणा तलावात ८१.४५ टक्के, तर भातसा धरणात ८८.०७ टक्के साठा आहे.
कोणत्या तलावात किती साठा?
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल #MyBMCUpdates pic.twitter.com/wpMXNE31xp
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 13, 2026
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2026 10:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

